Delhi

Budget 2023: बजेटमधील  आतापर्यंतच्या काही महत्वाच्या घोषणा….पहा Highliggts…!

Budget 2023: बजेटमधील आतापर्यंतच्या काही महत्वाच्या घोषणा….पहा Highliggts…!

दिल्ली मोदी सरकार 2.0 मधील पाचवं आणि शेवटच बजेट आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलं. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 हे अमृत काळातील पहिलं बजेट असल्याचं सीतारमन यांनी सांगितलं. महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करतेय, असं सीतारमण म्हणाल्या. जागतिक मंदीचा परिणामाची भिती असताना, विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाची साथ आणि रशिया-.युक्रेन युद्धामुळे जागतिक मंदीच वातावरण असताना, भारतीय अर्थव्यवस्थेची योग्य दिशेने वाटचाल सुरु आहे. भविष्य उज्वल आहे असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

– सीतारमण सादर करत असलेल्या बजेटमधील Highlights

इन्फ्रास्ट्रक्चर, पर्यावरण पूरक विकास, युवा ऊर्जा, आर्थिक सेक्टर यांना प्राधान्य देणार असल्याचं सीतारमण यांनी सांगितलं.

– भारतात PCI दरडोई उत्पन्नात 1.97 लाख कोटींची वाढ झाल्यात सीतारमण म्हणाल्या.

– देशातील नागरिकांना चांगल्या दर्जाच जीवन जगता यावं, यासाठी 2014 पासून सरकार प्रयत्नशील आहे.

– प्रदूषणाला कारणीभूत ठरणारं कार्बन उत्सर्जन कमी करुन पूर्यावरण पूरक विकास, रोजागार निर्मिती सरकारच लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

– कोरोनाची साथ आणि रशिया-.युक्रेन युद्धामुळे जागतिक मंदीच वातावरण असताना, सर्व महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्क्यांनी वाढली, असं सीतारमण म्हणाल्या.

– पंतप्रधान आवास योजनेचा खर्च 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक करण्यात येत आहे.

– येत्या तीन वर्षांत आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या 740 एकलव्य मॉडेल शाळांसाठी 38 हजार 800 शिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार

– देशात 50 नवे विमानतळ उभारण्यात येणार

– गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा फंड

– 50 नवीन विमानतळ उभारणार

– मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा होणार, त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च

– 44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button