Delhi

Politics: मोठी बातमी.. राहुल गांधी यांची खासदाकी रद्द..! खर बोलल्याची शिक्षा.. काँग्रेस ची तिखट प्रतिक्रिया…

Politics: मोठी बातमी.. राहुल गांधी यांची खासदाकी रद्द..! खर बोलल्याची शिक्षा.. काँग्रेस ची तिखट प्रतिक्रिया…

देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी खरं बोलले, याचीच त्यांनी शिक्षा मिळाल्याचं काँग्रेस नेता अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं. नोटबंदी, चीनची घुसखोरी, जीएसटी या मुद्दांवर राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

मानहानीच्या प्रकरणात गुजरातमधील सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचे संसद सदस्यत्व (खासदारकी) रद्द करण्यात आले आहे.

  • राहुल यांचे लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत सदस्यत्व रद्द

    – लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत सदस्यत्व रद्द होण्याची स्पष्ट कारणे देण्यात आली आहेत.
    – लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 अनुसार, एखाद्या फौजदारी प्रकरणात दोषी ठरल्यास खासदारकी रद्द करण्यात येते.
    – 2 किंवा 2 पेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास आमदार किंवा खासदारकीचं सदस्यत्व रद्द होतं
    – कलम 8(3)नुसार फौजदारी खटल्यात दोषी लोकप्रतिनिधीला दोषी ठरवण्यात आल्याच्या दिवसापासून 6 वर्ष तो व्यक्ती कोणतीही निवडणूक लढू शकत नाही
    – कलम 8(1) नुसार दोन समाजात तेढ निर्माण करणं, भ्रष्टाचार, गैरवर्तन यामुळे कारवाई होऊ शकते
    – 2022मध्ये समाजवादी पक्षाचे नेते चिथावणीखोर वक्तव्यांप्रकरणी आझम खान यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.

  • मोदी आडनावावरुन वादग्रस्त वक्तव्य
    काँग्रेस नेते राहुल यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी मोदी आडनावावरुन वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी मानहानी केली असून ते त्यात दोषी आढळले असे सूरत कोर्टाने म्हटले होते. त्यानंतर कोर्टाने त्यांना मानहानी गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. 2019 रोजी कर्नाटकातील एका सभेत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्यावर सूरत येथे गुन्हा दाखल झाला होता. 2019 मध्‍ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमधील कोलार येथे राहुल गांधी यांची सभा होती. यावेळी त्‍यांनी मोदी यांच्‍या नावावरुन वादग्रस्त विधान केले होते. देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याप्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप मंत्री पूर्णेश मोदी यांनी केला होता.

  • राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द

    मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहेत.

  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केले आहे. गुजरात येथील सूरत कोर्टाने गुरुवारी राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button