Nimbhora

निंभोरा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार. चौदाव्या वित्त आयोगातून निकृष्ट व चुकीच्या ठीकाणी शौचालय बांधकाम

निंभोरा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार. चौदाव्या वित्त आयोगातून निकृष्ट व चुकीच्या ठीकाणी शौचालय बांधकाम…शौचालय चक्क सेफ्टी टँक विना

संदीप कोळी

निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथील निंभोरा ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून साडेतीन लाखाचे शौचालये मंजूरकरून चुकिच्या ठिकाणी सेफ्टी टाकी न बांधता. तसेच पाण्याची टाकीची व्यावस्था न करता शौच्यालयाचे पुर्ण काम दाखवून संबंधीत अधिकारी के.व्ही.महाजन यांनी एम.बी.रेकार्ड पूर्णकरून कामपूर्ण झाल्याचा दाखला दिला. निंभोरा ग्रामपंचायतीने काम न पाहता हेतूपूर्वक दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायत चौदाव्या वित्त आयोगाचा साडेतीन लाखाचा निधि वायफळ खर्च केल्याचे दिसून येत आहे. याबाबत ग्रामस्थांचा खुप मोठा रोष असून या बाबत संबंधितांवर कारावाई करूण त्याच्या कळून नविन शौचालय योग्यठीकाणी उभारण्याची मागणी नागरीक करीत असून या बाबत ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी रावेर यांच्या कडे निंभोरा येथिल शिवसेनेचे माजी.प.स सदस्य प्रमोद कोंडे, शिवसेना गट प्रमुख नितीन पाटील, भाजपा युवामोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मनोज सोनार, निंभोरा भाजपा पदाधिकारी श्रीराम प्रभाकर सोनवणे यांनी तक्रार केली आहे.

*सूचवलेल्या जागेवर शौचालय उभारले नाही ग्रा.प.सदस्य प्रभाकर सोनवणे.*
वार्ड नं.२ मध्ये वडगाव रस्त्याने ग्रामपंचायतने शौचालय उभारावे अशी मागणी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकळे केली होती. परंतू संबंधित शौचालय नागरीकांना वापरणे सोईचे होनार नाही अशा ठिकाणी बांधून बांधकाम अपूर्ण व निकृष्ट केले आहे. ते मला व ग्रामस्थांना मान्य नाही. असे ग्रा.प सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी सांगितले.

संबंधित ठेकेदाराने सर्वांची दिशाभूल केली.

शौचालय उभारणाऱ्या ठेकेदाराने सर्वांची दिशाभूल करून शौचालय योग्य ठिकाणी न बांधता व न माहिती देता अपूर्ण काम केले आहे, तसेच पूर्ण झाल्याचे भासवून बिल काढून घेतले आहे. तरी यावर योग्य ती कारवाई करून संबंधित ठेकेदाराकडून नविन ठिकाणी याच किमतीचे शौचालय बांधून घेण्यात येईल. असे सरपंच डिगंबर चौधरी यांनी सांगितले.
तर
चुकीचे काम खपवून घेतले जाणार नाही सर्व संबंधितांवर कारवाई होणार.
ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांनी सांगितले.

सदर उभारलेल्या शौचालयाची पाहणी सबंधित अधिकारी के.व्ही महाजन, सरपंच डिगंबर चौधरी, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, ग्रा.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, शेख मुझाईद, मधुकर बिऱ्हाडे, युनुसखाँ शफी खाँ, रविद्र महाले , भुवण बोरोले व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button