Nimbhora

निंभोर येथे समस्या बाबत उपसरपंच यांना घेराव….सर्वच प्रमुख रस्ते चिखलमय

निंभोर येथे समस्या बाबत उपसरपंच यांना घेराव सर्वच प्रमुख रस्ते चिखलमय

रजनीकांत पाटील

निंभोरा बु .ता रावेर येथील वार्ड क्रमांक 6 हा विस्ताराने मोठा आहे विविध गल्ली बोळासह रस्त्यात सलग संततधार पावसामुळे सर्वत्र चिखल व दलदल असल्यामुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले असून त्यांनी 14 व्या वित्त आयोगातून गावात विविध ठिकाणी अनेक कामे सुरू असून अत्यंत गरजेचे व महत्वचे आरोग्याशी निगडित प्रश्‍नांकडे ही ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे व वार्डातील गावातील विविध रस्त्यांची दुर्दशा झाली असून तिला सोडवावी व कोरोना यासारख्या जागतिक महामारी मध्ये जिव्हाळ्याच्या व आवश्यक अशा या चिखलीच्या दलदला पासून सुटका करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

यावेळी वार्डातील महिला तसेच नागरिकांनी उपसरपंच यांच्या घरी घेराव घालत विचारणा केली असता व विविध प्रश्नांची सरबत्ती केली. याप्रसंगी त्यांनी सुकी नदीला पूर असल्याने तो ओसरल्यावर खरवा गिट्टी लवकरच टाकली जाईल व या समस्येवर तोडगा निघेल एक-दोन दिवसात काम सुरू होऊन अपेक्षित कामे सुरू होतील उपसरपंच सुभाष महाराज पाटील

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button