Maharashtra

जगात वाढलेल्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी सार्वजनिक जयंतीची मिरवणूक न काढता आपआपल्या घरातच राहून जयंती साजरी करावी

जगात वाढलेल्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी सार्वजनिक जयंतीची मिरवणूक न काढता आपआपल्या घरातच राहून जयंती साजरी करावी

:जयंती उत्सव समिती रावेर व रावेर तालुका बौद्ध समाज…

प्रतिनिधी शकील शेख

रावेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती दि. 14 एप्रील 2020 रोजी आहे. परंतु, संपूर्ण भारत देशात कोरोना विषाणू चा पादुर्भाव वाढल्याने भारत सरकारने दि. २५ मार्च २०२० ते १४ एप्रिल २०२० पावेतो संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर केलेली आहे. त्याच अनुषंगाने रावेर तालुक्यातील सर्व बौद्ध समाज्याने निर्णय घेतलेला आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती निमित्त निघणाऱ्या संपूर्ण मिरवणुका काढण्यात येणार नाही. किंवा ढोल ताशे व डी. जे. ई. वाजंत्री वाजविण्यात येणार नाही, फटाके,‍ आतिषबाजी न करता या वर्षी सर्व बौद्ध समाज्याने व आंबेडकरी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपआपल्या घरातच राहून सकाळी ठीक ९.०० वाजता सामाजिक अंतर (सोशल डिस्टंट) ठेऊन साजरी करावी. असे ठरवण्यात आलेले आहे. तसेच कोणीही घराच्या बाहेर रस्त्यांवर येऊन जयंती साजरी करू नये. अश्या प्रकारे सर्व रावेर तालुका बौद्ध समाज्याने शासन व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन समाजाला देण्यात येवून त्या प्रकारचे निवेदन मा. तहसिलदार, उषाराणी देवगुणे, नायब तहसिलदार, संजय तायडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिगळे, रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना देण्यात आले आहे.

तसेच पुढील नियोजना प्रमाणे आपण घरातच राहून १२९ वी जयंती सासरी करून एक आदर्श निर्माण करू या!

१) १४ एप्रिलच्या दोन तीन दिवस अगोदर घरावर रोशनाई करावी.

२) १३ एप्रिलच्या रात्री सर्वांनी १२.०० वाजता आपआपल्या घरात भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हार/पुष्प वाहून तसेच मेणबत्ती अगरबत्ती लावून वंदन करावे.

३) १४ एपिलच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वांनी आप आपल्या घरासमोर रांगोळी टाकावी.

२) सकाळी ठिक ९.०० वाजता घरातील सर्वांनी एकत्र येवुन पांढरे वस्त्र परिधान करावे

३) घरातील वातावरण मंगलमय करावे.

दि. 1‍4 एप्रिल 2020 रोजी सर्वांनी ठिक ९.०० वाजता खालील प्रमाणे कृती करावे.

(१) भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हार/पुष्प वाहून तसेच मेणबत्ती अगरबत्ती लावून वंदन करावे. (पंचांग प्रणाम), (२) त्रिसरण, पंचशील, (३) बुद्ध पुजा, (४) भिम स्मरण, भिम स्तुती, (५) मंगल मैत्री

वरील प्रमाणे आपआपल्या घरात एकत्र बसुन गाथा म्हणाव्यात. घरात गोड पदार्थ बनवावेत. सायंकाळी ठिक ६.०० वाजेपासून घरासमोर रांगोळी टाकावी, घरावर रोशनाई करावी, मेणबत्ती/दिवे लावावे. घरातच पुन्हा ठिक ७.३० वाजता एकत्र येवून भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हार/पुष्प वाहून तसेच मेणबत्ती अगरबत्ती लावून वंदन करावे. व पुढील गाथा म्हणाव्यात. (१) त्रिसरण, पंचशील, (२) बुद्ध पुजा, (३) भिम स्मरण, भिम स्तुती, (४) मंगल मैत्री (५) सरणत्तय अशा प्रकारे, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती लॉकडाऊनचे पालन करून सुद्धा ऐतिहासिक जयंती सासरी करु या असे बौध्द समाजा तर्फे मा. तहसिलदार, रावेर व पोलीस निरीक्षक, यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जयंती उत्सव समिती अध्यक्ष सावन मेढे,‍ सचिव धुमा तायडे, खजिनदार धनराज घेटे, जयंती उत्सव समिती सल्लागार ॲड. योगेश गजरे, पंकज वाघ, बौध्दाचार्य भारतीय बौध्द महासभा राजेंद्र अटकाळे, केंद्रीय शिक्षक भारतीय बौध्द महासभा संघरत्न दामोदरे, श्रीराम फांऊडेशनचे चे सचिव दिपक नगरे, ॲड. संदीप मेढे इ. सहया आहेत.

* घरी राहा – सुरक्षित राहा *

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button