Nimbhora

बांधावरील तणासाठी सामूहिक तणनाशक फवारल्यास सीएमव्हीचा अटकाव शक्य होण्यास मदत-डॉ के बी पाटील

बांधावरील तणासाठी सामूहिक तणनाशक फवारल्यास सीएमव्हीचा अटकाव शक्य होण्यास मदत-डॉ के बी पाटील

निंभोरा येथे केळी उत्पादक संवादातील सूर.

संदीप कोळी

निंभोरा येथे व परिसरातील केळी बागांवर आलेल्या कुकुंबर मोझॅक व्हायरस(सीएमव्ही)मुळे केळी बागा उपटून फेकाव्या लागत असल्याने या रोगाच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉ के बी पाटील यांनी निंभोरा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत रोगाच्या उच्चाटनासाठी आपल्या बांधावरील तणाच्या नियंत्रणासाठी एका शिवारात एकदाच सर्व शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने व बांधावर वाढलेल्या तणांवर तणनाशक फवारून होस्ट नष्ट करावे. ज्यामुळे सी एमव्ही चे वाहक कमी होऊन रोगाचे नियंत्रण करणे शक्य होईल असे आवाहन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा केळी तज्ञ डॉ के बी पाटील यांनी निंभोरा येथे शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन करतांना केले.

निंभोरा येथील कृषी तंत्र विद्यालयात सीएमव्ही रोगाबाबत केळी उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करताना डॉ के बी पाटील यांनी या रोगाचा इतिहास सांगून या रोगाच्या उच्चाटनासाठी या रोगाची ओळख व त्याचा वेगवेगळ्या वाहक असलेल्या गवतवर्गीय व वेलवर्गीय ८०० वनस्पती असून यांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे सांगत यासाठी गावोगावी सामूहिक प्रयत्न करून प्रत्येक शिवारात एकाच दिवशी तणनाशक फवारणी करण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष शेताशेजारी असलेल्या तणांवर असलेल्या रसशोषक किडी तसेच त्या पिकांवरील सीएमव्ही रोग प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवून दिला तसेच cmv रोग सर्व प्रथम १९४३ साल मध्ये जळगाव जिह्यात प्रथम अधलून आला. या रोगाला त्या काळात आपण “हरण्या” नावाने ओळख असल्याचे सांगितले.रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी शिवारात एकाच वेळी फवारणी तसेच आलटून पालटून कीटकनाशकांची फवारणी करण्याबाबत ही डॉ पाटील यांनी सांगितले.यावेळी त्यांनी जुने व नवीन आधुनिक शेतीसंदर्भातील दाखले देत देश-विदेशातील केळी उत्पादकांबाबत व नियोजनाबाबत माहिती दिली.यावेळी कृषी विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे,प्राचार्य एम टी बोंडे यांनी त्यांचे स्वागत केले. सदर केळी उत्पादकांच्या बैठकीस राहुल भारंबे, सुनील कोंडे, सुधीर मोरे, सचिन चौधरी,विष्णू भिरुड,गोपाळ भिरुड,योगेश कोळंबे,सुरेश भंगाळे,स्वप्नील ब-हाटे,विवेक बोंडे,प्रशांत काठोके, बलवाडीचे राहुल पाटील,खिर्डी चे गिरीश ढाके,रणजित पवार,यांसह आदी शेतकरी उपस्थित होते.प्रास्ताविक सुनील कोंडे यांनी तर आभार राहुल भारंबे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button