Nimbhora

निंभोरा पोलिस्टेशन हद्दीतील २९ गावातील गणपतींचे आज विसर्जन. कोरोणाचे सावट असल्याने सकाळी १२ च्या आत करावे शांततेत करावे विसर्जन :- ए.पी.आय महेश जानकर.

निंभोरा पोलिस्टेशन हद्दीतील २९ गावातील गणपतींचे आज विसर्जन.
कोरोणाचे सावट असल्याने सकाळी १२ च्या आत करावे शांततेत करावे विसर्जन :- ए.पी.आय महेश जानकर.

संदीप कोळी

निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथिल पोलिस्टेशन हद्दित २९ गावे येत असून आज अनंत चतुर्थी ला ७६ गणेश मंडळे श्रीगणेशाचे विसर्जन करणार आहे या साठी गर्दी व प्रदुषण टाळण्यासाठी २९ गावांच्या ग्रामपंचायती निर्माल्य गोळा करणार असल्याची माहीती निंभोरा पोलीसस्टेशनचे ए.पी.आय महेश जानकर यांनी ठोस प्रहारदिली. ८२ मंडळांन पैकी ७ गावांना एक गाव एक गणपती स्थापणा झाली होती. सार्वजनिक ३६ मंडळे, खाजगी ३९ असे एकून ८२ त्या पैकी सातव्या दिवशी २ तर दहाव्या दिवशी ४ श्रीगणेशांचे विसर्जन झाले उर्वरीत ७६ मंडळांचे अकराव्या दिवशी अनंत चतुर्थीला होनार आहे. निंभोरा येथे १६ मंडळांनी श्रीगणेशाची स्थापणा केली होती त्यात सार्वजनिक ७ व खाजगी ९ अशा १६ मंडळांनी श्रीगणेश स्थापणा केली होती निंभोरा येथिल विसर्जन आज अनंत चतुर्थीला सुकी नदी पात्रात होनार आहे. निंभोरा ग्रामपंचायत निर्माल्य जमा करणार आहे. या पार्श्वभूमीवर ए.पी.आय महेश जानकर यांनी सकाळ पासून दुपार पर्यंत १२ च्या आत सर्व मंडळ व घरगुती यांनी बाप्पा चे विसर्जन करावे असे आवाहन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १८ होमगार्ड, ३ महीला पोलीस, २५ पोलिस कर्मचारी व दोन अधिकारी असा फौजफाटा २९ गावत चोख बंदोबस्त ठेवनार असल्याचे ए.पी.आय.महेश जानकर यांनी कळविले.

संकलन समिती मध्ये सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस कर्मचारी व मंडळाच्या पदाधिकारींची निवड करण्यात आली आहे तरी मंडळ व घरघुती श्रीगणेश मुर्ती संकलन समिती कडे जमा करावे जनेकरून गर्दी न होता सोशल डिस्टींगशन चे पालन करून सर्व विधिवत श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन होईल. सकाळपासून दुपारी १२ वाजे पर्यंत विसर्जन करण्याचे आवाहन निंभोरा ए.पी.आय महेश जानकर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button