Nimbhora

योगदिनानिमित्त निंभोरा येथे योगासनांचे धडे, कृषी विद्यालयात होतात नियमित योगवर्ग.

योगदिनानिमित्त निंभोरा येथे योगासनांचे धडे, कृषी विद्यालयात होतात नियमित योगवर्ग.

संदिप कोळी निभोरा

निंभोरा : येथील कृषितंत्र विद्यालयात आज जागतिक योगदिनानिमित्त अंबिका योग कुटीर,ठाणे संचलित योगवर्ग गेल्या १२ वर्षांपासून नियमित भरत आहे.तरुणांना व्यसनमुक्ती व वाईट सवयीपासून वाचवून योगवर्गाचे धडे देण्याचा कार्यक्रम नियमित होत असून फक्त कोरोना काळात हे वर्ग बंद करण्यात आले होते.
जागतिक योगदिनानिमित्त हा योगवर्ग पुन्हा सुरू झाला असून दररोज सकाळी ०५:३०वाजता योग प्रेमी एकत्रित योगासने करुन घेतली जातात.यावेळी कृषी विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे,योग शिक्षक डॉ एस डी चौधरी,विष्णू दोडके,ग्रा पं सदस्य शेख दिलशाद यांनी दिपप्रजवलन करून योगवर्गाची सुरुवात केली.यावेळी त्यांनी अनुलोम,विलोम,कपालभाती,भुजंगासन,पद्मासन,उत्तीत पादासन, गोमुखासन आदींसह जलनेतीचे प्रात्यक्षिक करून घेतले.यावेळी योग प्रात्यक्षिकास सुनिल कोंडे,विवेक बोंडे,धीरज भंगाळे,जितेंद्र भावसार,हिमांशू भंगाळे,धनराज बावस्कर,जितेंद्र कोळंबे, प्रवीण बारी,दर्पण भंगाळे,चंदन भंगाळे,यांसह आदी योगप्रेमी या योगवर्गास उपस्थित होते.
गेल्या १२वर्षांपूर्वी स्टेट बँकेच्या निंभोरा शाखेत असलेले बँक अधिकारी रमेश वासवानी यांनी या योगवर्गाची सुरुवात अंबिका कुटीर योग,ठाणे यांच्या माध्यमातून निंभोरा येथे डॉ एस डी चौधरी यांच्या सहकार्याने केली.कालांतराने याचे फायदे अनेकांना दिसू लागल्याने योग वर्गास चांगला प्रतिसाद लाभला. कृषी तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांना या योगवर्गाचे धडे नियमित दिले जातात.कोरोना काळात काही महिन्यांपासून थांबलेले योगवर्ग पुन्हा सुरू होत असून याचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी तंत्र विद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
——-
निंभोरा येथे गेल्या १२ वर्षांपासून हा योगवर्ग सुरू असून या मोफत योग्य शिबिराचा तरुणांनी जास्तीत जास्त लाभ घेणे गरजेचे आहे.

डॉ एस डी चौधरी,
योगशिक्षक,निंभोरा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button