Amalner

?️अमळनेर कट्टा..ताडेपुरा भागात दोन ठिकाणी अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड..!

?️अमळनेर कट्टा..ताडेपुरा भागात दोन ठिकाणी अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड..!

अमळनेर येथील ताडेपुरा भागात काल सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भूषण बाविस्कर, पोउपनिरी श्री राहुल लबडे सोबत पोहेका 418 सुनिल हटकर पोना 1970 कैलास शिंदे होम विष्णु पाटील महिला होम 1230 अनिता बडगुजर हे अमळनर पोलीस स्टेशन येथे हजर असताना मा.पो.नी. श्री जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहरात धरणगांव रस्ता ताडेपुरा भागात कंजरवाड्यात एक महिला रूपा विक्की मांटुगे ही बिना पासपरमिट शिवाय गा.ह.भ.ची दारू आपले कब्जात बाळगुन तीची चोरटी विक्री करीत आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तुम्ही जाऊन खात्री करून तिच्यावर प्रोव्हीशन रेड करा असे कळविल्याने पोउपनि श्री.राहुल लबडे यांनी दोन पंचाना पोलीस स्टेशनला बोलावून वरील प्रमाणे बातमी सांगितली.सदर पंचांनी पंच म्हणुन हजर राहण्यास संमती दर्शविल्याने आम्ही पोलीस एक महिला तिच्या घराच्या आडोशाला बसुन तिच्या समोर दोन प्लास्टीकचे कॅन घेवून बसलेली दिसली. पोलीस स्टाफ व पंच असे खाजगी वाहनाने बातमी ठिकाणा लगत जावून वाहन दुरवर उभे करून तेथून पायी मार्गे जावून दुरूनच खात्री करता झाल्यावर आम्ही पोलीसांनी तिच्यावर अचानक 18.40 वा छापा टाकला. पोलीसांची चाहूल लागल्याने गालीबोळातुन पळुन गेली तिचा पाठलाग महिला होमगार्ड अनिता बडगुजर यांनी केला व तिस ओळखुन रुपा मांटुगे थांब मी तुला ओळखले आहे.असे बोलून देखील ती पळून गेली. जागेवर पंचनामा करून
प्रत्येकी 20 लीटर गा.ह.भ.ची दारू एकुण 40 लीटर गा.ह.भ.ची दारू यास घेवून खात्री केली. येणेप्रमाणे वरील वर्णनाच्या व किंमतीची गा.ह.भ. ची दारू मिळुन आल्याने सदर कॅनमधुन गा.ह.भ.ची दारू एका 180 एम.एल.मापाच्या काचेच्या बाटलीत भरून सदर बाटल्यांवर जागीच पो. पंचनामा पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल लबडे यांनी जागीच केला आहे. तरी दि. 28/06/2021 रोजी 18.40 वा.ता आरोपी नामे रूपा विक्की भाटुंगे रा, टाकरखेड़ा रोड तांडेपुरा कंजरवाडा हिच्यावर गुन्हाचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पुरुषोत्तम पाटील हे करत आहेत.

त्याचबरोबर ह्याच वेळीब योगेश महाजन ,पोउपनिरी श्री गंभीर शिंदे सोबत स.फौ.246 दापु साळुखे पोना/2973,दिपक माळी, होम अनिल चौधरी महिला
होम 1232 निर्माला टिवरे,यांनी मा.पो.नी. श्री जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली
अमळनेर शहरात धरणगांव रस्ता ताडेपुरा भागात कंजरवाड्यात एक महिला नामे
मालाबाई अशोक कंजर ही विना पासपरमिट शियाय देशी दारू तसेच गा.ह.भ.ची दारू आपले कब्जात बाळगुन तीची चोरटी विक्री करीत आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस स्टाफ व पंच असे सरकारी वाहनाने बातमी ठिकाणालगत जावून बाहून दुरवर उभे करून तेथून पायी मार्गे जावून लांबूनच बातमीची खात्री करता एक महिला तिच्या घराच्या आडोशाला बसुन तिच्या पुढ्याचं एक पिशवी व दोन प्लास्टीकचे कन घेवून बसलेली दिसली. आम्हा पोलीसांची व
पंचांची खात्री झाल्यावर आम्ही पोलीसांनी तिच्यावर अचानक 18.10 वा छापा टाकला व तिस आम्हा पोलीसांची चाहुल लागल्याने गलीबोळातुन पळुन गेली तिचा पाठलाग महिला होमगार्ड निर्मला टिवरे यांनी केला.व तिस ओळखुन मालाबाई कंजर थांब मी तुला ओळखले आहे.असे बोलुन देखील ती गालबोळातुन पळून गेली. तिने माल जागीच सोडुन दिला. प्रोव्हशन गुन्ह्याचा माल खालीलप्रमाणे 540/-रु
किंमतीच्या 180 एम.एल भापाच्या एग 9 टैंगो पंच कंपनीच्या देशी दारूच्या सीलबंद बाटल्या प्रत्येकी किं.60 रूपये प्रमाण तसेच 180 एम. एल.मापाच्या एकुण 5 देशी संञा कंपनीच्या काचेच्या बाटल्या सीलबंद प्रत्येक 60 रू.किमतीच्या 1600/- रू.किमतीच्या 2 प्लास्टिकचे कॅन प्रत्येकी 20 लीटर गा.ह.भ.ची दारू एकुण 40 लीटर गा.ह.म.ची दारू वास घेवून खात्री केली.
संत्रा कंपनीच्या देशीदारूच्या बाटल्या तसेच गा.ह.भ.ची दारू मिडुन आल्याने सदर बाटल्यामधुन एक टैंगो पंच व एक संञा कंपनीची देशी दारूच्या बाटल्या काढून घेवून तसेच गा.ह.भ.ची दारू एका 180 एम.एल.मापाच्या काचेच्या बाटलीत भरून सदर बाटल्यांवर जागीच पो. स्टेचे लाखेचे सील करून त्यावर दोन पंचांच्या कागदावे सहाचे लेबल लावले व सदर देशीदारूच्या बाटल्या ताब्यात घेवून गा.ह.भची दारू
जागीच पंचासमक्ष नाश केली व त्याच्या सविस्तर पंचनामा पोलीस उपनिरीक्षक श्री गंभीर शिंदे यांनी जागीच केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 ई प्रमाणे मालाबाई अशोक कंजर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुनील राजाराम पाटील हे करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button