Pune

दिलेला शब्द खरा ठरवत बंडगरसाहेबांनी २५ हजाराचा Android Tv वनगळी जिल्हा परिषद शाळेस सुपूर्द केला

दिलेला शब्द खरा ठरवत बंडगरसाहेबांनी २५ हजाराचा Android Tv वनगळी जिल्हा परिषद शाळेस सुपूर्द केला

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जगाशी स्पर्धा करावी. यासाठी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे गावातील सर्वांचे कर्तव्य आहे. माझ्या परिने फुल नाही पण फुलाच्या पाकळी एवढी मदत शाळेला केली आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना टि.व्ही.चा निश्चितपणे लाभ करून देतील याची मला खात्री आहे.लोकसहभागाची चळवळ शाळांपासून सुरू होणे आवश्यक आहे. मी जिल्हा परिषद शाळेतच शिकून स्पर्धा परिक्षा पास झालो आहे.असे मत मा.डी.वाय.एस.पी.अण्णासाहेब बंडगर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
टि.व्ही.शाळेला सुपूर्द करण्याचा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बिजवडी ग्रामपंचायतीच्या मा.सरपंच आणि विद्यमान सदस्या सौ.नंदाताई हिरालाल पारेकर सौ.सावित्री अण्णासाहेब बंडगर,वैशाली मोहन बोडके, पुनम सोनवले मॅडम,लता लावंड मॅडम ,छाया घोटरे मॅडम यांनी टि.व्ही चे पूजन केले.
शाळेच्या वतीने अण्णासाहेब बंडगर यांचा मुख्याध्यापक सिद्धेश्वर गणगले सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रसंघटक रविंद्र सातव सर कालठण नं.१ चे मुख्याध्यापक राजेंद्र जगताप ,मोहन बोडके,स्वप्निल पारेकर,समाधान ढावरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले.यावेळी संतोष शिंदे सर ,तात्या मसलखांब सर,संतोष घोडके सर,विठ्ठल सावंत सर,मंगेश मखरे सर,वैभव करगळ,अतुल मोहन पारेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आनंद सोहळा संपन्न झाला.
प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन सुहास मोरे सर यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button