Amalner

बोरी मध्यम प्रकल्प, तामसवाडी या प्रकल्पातून आवर्तन सोडा…माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र

बोरी मध्यम प्रकल्प, तामसवाडी या प्रकल्पातून आवर्तन सोडा…माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र

अमळनेर
विषयांकीत बोरी मध्यम प्रकल्प, तापी खोरे मधील बोरी उपखोरे मध्ये येतो या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ६३९८ चौ. कि.मी. असून प्रकल्पाचा एकूण जलसाठा ४०.३१ दलघमी (१.४० टिएमसी) आहे. यावर्षी २७ जुलै,२०२१अखेर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होवून पाणी पातळी २६५.५५ मीटर पर्यंत असून जीवंत साठा १३.३७९ दलघमी आणि मृतसाठा १५.१६ दलघमी एवढा असून त्याची टक्केवारी ५३.२० आहे. पारोळातालुक्यातील सन २०२१ या खरीप हंगामातील पर्जन्यमान ६१९.७६ मी.मी. पैकी २७ जुलै, २०२१ अखेर ३४०.६० मी.मी. एवढे झालेले आहे. आणि अमळनेर तालुक्यातील चालू खरीप हंगामातील पर्जन्यमान ५८९.००
मी.मी. पैकी २७ जुलै, २०२१ अखेर फक्त ११०.०५ मी.मी. एवढे नगण्य पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती (दुष्काळाची प्रथम कळ) निर्माण झालेली आहे.

सुमारे ४० हजार हेक्टरात दुबार पेरणी होवून ही सर्वच नक्षत्रांनी यावर्षी पाठ फिरवल्याने शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे,सबब: बोरी मध्यम प्रकल्पाच्या जलनियोजनातील तरतुदीनुसार पारोळा तालुक्यातील आणि अमळनेर तालुक्यातील नदीकाठांवरील गावांसाठी अप्रत्यक्ष शेती सिंचनासह लोकांना आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे अशा आशयाचे पत्र माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मेलद्वारे मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button