Nashik

श्री स्वामी समर्थ सेवा आयोजित नासिक डोंगरे मैदान जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप

श्री स्वामी समर्थ सेवा आयोजित नासिक डोंगरे मैदान जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र कार्यक्रमाची सुरुवात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तर समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्तीतीत संपन्न झाला. सर्वांसाठी मोफत प्रवेश असलेल्या या मोहत्सवास सहा राज्यांसह नेपाळ देशातून आलेल्या शेतकऱ्यांनी भारतीय पारंपरिक पद्धतीची विषमुक्त शेतीची माहिती जाणून घेतली. सुमारे चार लाख नागरिकांनी भेट दिली, तर महोत्सवात सुमारे १२ कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे.
श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, समर्थ आली. गुरुपीठ आणि श्रीस्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव पार पडला. या महोत्सवात शेतीसंबंधित मोठी आर्थिक उलाढाल झाली. विषमुक्त शेती, भरड धान्य आणि सेंद्रिय शेतीच्या प्रसारावर भर देण्यात आलेल्या या महोत्सवात सुमारे चार लाख नागरिकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. नेपाळ येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महोत्सवाला हजेरी लावत सेंद्रिय शेतीचा प्रयोग आपल्या देशात करण्याचा संकल्प करीत चिनी तंत्रज्ञानावर नव्हे, तर भारतीय पारंपरिक पद्धतीची शेती आणि सेंद्रिय तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत आपली भूमिका असल्याचे सांगत माहिती जाणून घेतली. महोत्सवात स्थानिक शेतकऱ्यांची संख्या अधिक होती.
७ हजार बेरोजगार; १५० जणांना रोजगार
कृषी महोत्सवात ‘शेतीजोड व्यवसाय’ आणि स्वयंरोजगार सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रासाठी सुमारे सात हजार कृषी पदवीधरांसह बेरोजगार तरुणांनी हजेरी लावली होती. या तरुणांना अनेक अॅग्रिकल्चर कंपन्यांचे शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ दाखल झाले होते. महोत्सवात मेळाव्यात शेतीसंलग्नित कंपन्यांकडून कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यातून दीडशे तरुणांना थेट नियुक्तीपत्रे देण्यात आली.

५ हजार विवाह नोंदणी; आठ सामुदायिक विवाह संपन्न.
विवाह संस्कार विभागाच्या वतीने सुमारे पाच हजार विवाह मुला मुलींची नोंदणी झाली तर त्याच ठिकाणी आठ विवाह संपन्न झाले. या वेळी नवदाम्पत्यांना संसार उपयोगी वस्तू आबासाहेब मोरे यांच्या हस्ते देण्यात आल्या.

ग्रीन पास
मोहत्सवास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनामुल्य प्रवेश घेण्यासाठी ग्रीन पास चा यशस्वी वापर झाल्याने सर्वांनी या संकल्पनेचे स्वागत केले.
गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने कृषी महोत्सवाची कीर्ती जागतिक पातळीवर पोहोचली आहे. नेपाळसह देशातील सहा राज्यांतील शेतकऱ्यांनी भेट दिली. पाच दिवसांच्या या महोत्सवात शेतकऱ्यांची मोठी उलाढाल झाली. लाखो नागरिकांनी भेट दिली. स्थानिक शेतकऱ्यांचीदेखील लाखोंनी उलाढाल झाली. तरुण बेरोजगारांना रोजगार आधार मिळाला.

-आबासाहेब मोरे, कृषी अभियान प्रमुख, सेवा मार्ग

फोटो :- :- श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्यावतीने आयोजित पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवात भारतीय पारंपरिक पद्धतीची विषमुक्त शेतीची माहिती जाणून घेतांना नेपाळ येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळ…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button