Kolhapur

महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी ईगल फाउंडेशन कटीबद्ध -विलासराव कोळेकर

महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी ईगल फाउंडेशन कटीबद्ध -विलासराव कोळेकर

सुभाष भोसले-कोल्हापूर
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी ईगल फाउंडेशन नेहमीच अग्रभागी असेल असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष व
ईंगल फाउंडेशनचे राज्यअध्यक्ष व संस्थापक विलासराव कोळेकर ,राज्यसचिव शेखर सूर्यवंशी यांनी केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली या फाउंडेशनची स्थापना करणेत आली आहे.या फाऊंडेशन चा उद्देश असा की,महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बंधू -भगिनींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे,त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना जिल्हा,राज्य,राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार देणे त्यांचा गौरव करणे.
शिक्षक विदयार्थी यांचेसाठी शैक्षणिक शिबीरे आयोजीत करणे.शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणे.गरीब व होतकरू मुलांना मदत करणे त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे.शिक्षकांसाठी संमेलनाचे आयोजन करणे.शिक्षक विदयार्थी यांना प्रेरणा देणे.राज्यपातळीवर मुलांसाठी वेगवेगळया स्पर्धा आयोजीत करणे अशाच अनेक उदात्त हेतूसाठी या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून देणेत येणार आहे .
ईगल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार रविवार 24 नोव्हेंबर रोजी पन्हाळा येथे मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र पत्रकार संघाच्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button