Akola

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमचे मा. आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते उद्घाटन

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमचे मा. आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते उद्घाटन अकोले प्रतिनिधी – विठ्ठल खाडेअहमदनगर /अकोले :- राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत चाललेला आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले आहे. त्यासाठी त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्यास सांगितले आहे. याचपार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजुर, विठे , चितळवेढेे येथे ‘माझे कुटुंब, माझी जबाबबदारी’ या मोहिमेचे व नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझर रथाचे उद्घाटन माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी राजुर गावचे सरपंच गणपत देशमुख , पंचायत समितीचे बि डी ओ एकनाथ चौधरी, सभापती उर्मिला राऊत, उप सभापती दत्तात्रय देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पाटिल गायकर, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव यशवंतराव आभाळे, ग्रामविकास अधिकारी भैरवनाथ नाडेकर , शांताराम काळे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, विठे चितळवेढेे व राजुर या ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.ही योजना १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत या मोहिमेअंतर्गत अकोले तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ इंद्रजित गंभीर यांनी सांगितले व त्यांच्या सहकार्यानी प्रत्येक घरात तसेच गावांमध्ये जाऊन दोन महिन्यामध्ये दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी तसेच चेक द कोरोना डिटेक्ट कोरोना अँड ट्रीट कोरोना संदर्भात दवंडी देऊन माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी सहकार्य करावे असे आवाहन शासनाने केले आहे. या मोहिमेला अकोले तालुक्यातील सर्वच नागरिकांचा चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे मत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीर यांनी सांगितले. अकोले तालुक्यामध्ये बहुंताश भागामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे राजूर, अकोले, समशेरपूर ही बाजारपेठे बंद करण्यात आलेली आहेत. मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘ब्लॅक बेल्ट’ म्हणून करावा. सदा सर्वदा मास्क लावावा. शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना फेस टू फेस बोलणे टाळण्याचा सल्ला माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button