Akola

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्याने विवंचना पाल्यांचा शाळा प्रवेशासह इतर अनेक प्रशन मुकुंद कोरडे

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्याने विवंचना पाल्यांचा शाळा प्रवेशासह इतर अनेक प्रशन मुकुंद कोरडे

फहिम शेख अकोला

अकोट (जि. अकोला) : आधी १५ टक्के तर नंतर २५ टक्के बदल्या करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र अपेक्षित तारखा लोटूनही बदल्या होत नसल्याने पोलिस विभागातील अधिकाऱ्यांना आता अनेक प्रश्न भेडसावत आहेत.

पोलिस विभागातील सार्वत्रिक बदल्या गृह विभाग, पोलिस महासंचालक कार्यालय परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याकडून क्रमवार करण्यात येतात. मात्र गृह विभाग व पोलिस महासंचालक कार्यालयातून अद्यापही बदल्या करण्यात न आल्याने बदली प्रक्रिया थांबलेली आहे. प्रशासकीय व विनंतीच्या अनुषंगाने ३ ते ४ महिन्यांपूर्वी बदली कक्षेतील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती आपआपल्या घटक प्रमुखांकडून वरिष्ठ कार्यालयात देण्यात आली होती.

माहिती दिल्यानंतर संबंधित काही गरजवंत अधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालकांच्या दरबारात हजेरी लाऊन आपली बदली करण्याची विनंती केली. तेव्हापासून बदली कक्षेतील अधिकाऱ्यांना बदलीच्या यादीचे वेध लागले आहेत. त्यातच काही जणांना तर आपली बदली होते किंवा जेथे आहे तेथेच रहावे लागेल अशी शंका निर्माण झाली आहे. या सर्व विवंचनेत अधिकारी वर्ग अडकून पडला असल्याने बदल्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button