Pune

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाची भोसे येथे उद्या महत्त्वपूर्ण बैठक-गणेश पावसे.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाची भोसे येथे उद्या महत्त्वपूर्ण बैठक-गणेश पावसे.

प्रतिनिधी : रफीक आत्तार

पुणे : पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक मा.शरदजी लाड यांचे सुचनेनुसार उद्या राष्ट्रवादी पदवीधर संघाची महत्त्वपुर्ण बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नुतन जिल्हाध्यक्ष मा.गणेशदादा राजूबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष मा.सुग्रीवजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दुपारी ठिक १ वाजता मौजे भोसे ता.पंढरपूर येथे संपन्न होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मा.गणेश पावसे यांनी दिली आहे.
सदर बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना ही बैठक अनिवार्य असल्याची माहिती जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मा.गणेश पावसे यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button