Amalner

?️ उद्या पासून मास्क आणि भौतिक अंतर न ठेवल्यास दंडात्मक कार्यवाही…पुन्हा ये रे माझ्या मागल्या..मोठे मासे सुरक्षित आणि लहानांवर कार्यवाहीचा बडगा..नगरपरिषदेची तिजोरी भरण्याची तयारी सुरू

?️ उद्या पासून मास्क आणि भौतिक अंतर न ठेवल्यास दंडात्मक कार्यवाही…
पुन्हा ये रे माझ्या मागल्या..मोठे मासे सुरक्षित आणि लहानांवर कार्यवाहीचा बडगा..

आता मास्क नसेल तर जागेवर दंड भरा सुरक्षित अंतर नसेल दंड आकारला जाईल असे आदेश अमळनेर व जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.मास्क न लावल्यास आणि योग्य ते अंतर न ठेवल्यास 200 ते 500 चा दंड वसूल करण्यात येणार आहे.नाहीतर जेल होऊ शकते.

उद्या पासून म्हणजे दि 24 नोव्हेंबर 2020 मंगळवार पासून चेहऱ्यावर मास्क न वापरल्यास 200 व 500 रू, दंड वसूल केला जाईल तसेच भौतिक अंतर न पाळल्यास सक्त कारवाई केली जाईल आज जाहीर केले आहे.

दीपावली च्या पार्श्वभूमीवर तसेच मंदिरे व इतर सार्वजनिक ठिकाणे खुली झाली आहेत त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते . या साठी हा निर्णय घेण्यात आला आहे.अमळनेर नगरपरीषदेने धोका वाढू नये म्हणून सदर निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.विशेष म्हणजे कोणतीही बैठक किंवा लेखी आदेश देण्यात आले नाहीत.आता पुन्हा अमलन6नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची मग्रुरी नागरिकांना झेलावी लागणार आहे. आया मन में गया बन में अशी स्थिती आहे.

अमळनेर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले नियम अचानक पणे शिथिल केले होते. वास्तविक शासनाच्या कडक सूचना असतानाही त्यांचे पालन केले जात नव्हते.परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे ही निदर्शनास आले.

पण नियम हे सर्वांसाठी सारखे असतील अशी अपेक्षा आहे. मोठ्यांना सूट आणि वाहनांवर कार्यवाही चा बडगा ही स्थिती गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक अनुभवत आहेत आणि हैराण ही झाले आहेत. मोठे मासे सुटून जातात आणि बिचाऱ्या गरीब सामान्य माणसाला आर्थिक फटका बसतो असे नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांचे कटू अनुभव जनतेने अनुभवले आहेत.आणि आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या होणार की काय यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button