Pune

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी महिलेवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी – बिरसा क्रांती दल राजगुरूनगर

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी महिलेवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी – बिरसा क्रांती दल राजगुरूनगर

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर मध्ये पडसाद उमटले

पुणे / प्रतिनिधी दिलीप आंबवणे

चंद्रपूर येथील आदिवासी महिलेला विवस्त्र करून धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी बिरसा क्रांती दल खेड तालुका वतीने नायब तहसिलदार राजेश कानसकर यांना निवेदन देऊन केली.
निवेदनात म्हटले आहे की श्रीमती तृप्ती मनोज कुळमेथे राहणार चंद्रपूर ही आदिवासी महिला येथील एका परिचित व्यक्तीकडे दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी लग्न समारंभ कार्यक्रमासाठी जलनगर वार्ड कंजर मोहल्ला येथे गेले असता दुसऱ्या महिलेच्या घरी बसून असताना सौ सारिका कंजर, नरेश कंजर, अक्षय कंजर, अमन जाट या चार जणांनी तिला विवस्त्र करून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला तिच्या हातावर मांडीवर पाठीवर धारदार चाकूने गंभीर जखमी केले.

या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्यांना अजून पर्यंत अटक करण्यात आलेली नाही आरोपी हे दारू व्यवसाय करीत असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे.
आरोपी फरार असून आदिवासी महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे वास्तविक घटनास्थळ हे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे पण तरीही आरोपी नाटक करण्यात आलेले नाही आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी ही विनंती अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल.

त्यावेळी बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राहुल आढारी, खेड तालुका कार्याध्यक्ष हरिभाऊ तळपे, तालुका उपाध्यक्ष संतोष भांगे, सरपंच सुधिर भोमाळे, सरपंच शशिकांत वाजे,सरपंच सोमा किरवे, संकेत झांजरे, कुंडलीक बुरूड, यंशवत शिंगाडे, चंद्रकांत वासाळे आदी नागरीक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button