Kagal

जनतेच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकणार नाही -समरजितसिंह घाटगे

जनतेच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकणार नाही -समरजितसिंह घाटगे

सुभाष भोसले-कोल्हापूर
कागल विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरीही कागलच्या स्वाभिमानी जनतेचा हा नैतिक विजय आहे.

कागल तालुक्यात आपला गट चार नंबरवर आहे असे बोलले जात होते. परंतु आपणास 87,665 इतके मतदान मिळाले आहे. हे मतदान पाहता आपण दोन नंबरवर आहोत हे आपण सिद्ध करून दाखवलेआहे.

विशेष म्हणजे हे मतदान पक्षाचे अधिकृत बॅनर नसताना मिळाले आहे. ही बाब आपल्यासाठी
अभिमानस्पद आहे.ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्यावर लढलो. यापुढेही कागलच्या राजकारणात आपली वाटचाल विकासात्मक राहणार आहे.

या निवडणुकीत मुरगूडचे रणजितसिंह पाटील, उदय बाबा घोरपडे,बाबासाहेब पाटील,डॉ.प्रकाश शहापूरकर या प्रमुख गट नेत्यासह छोटे मोठे कार्यकर्ते तसेच कागल, गडहिंग्लज, उत्तुर मधील स्वाभिमानी जनतेने विजयासाठी घेतलेले परिश्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.

जनतेचा कौल मला मान्य आहे. निवडणुकीमध्ये जय-पराजय असतोच. पण कागल, गडहिंग्लज, उत्तूर ची स्वाभिमानी जनता,कार्यकर्ते ज्ञात- अज्ञात व्यक्ती यांनी माझ्या विजयासाठी घेतलेल्या कष्टाच्या ऋणातून कधीही मी मुक्त होऊ शकनार नाही.अशी प्रतिक्रिया राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button