KagalKolhapurखेळ भारत

कागल येथे विभागीय व्हॉलीबॉल् स्पर्धा संपन्न

कागल येथे विभागीय व्हॉलीबॉल् स्पर्धा संपन्न

कागल येथे विभागीय व्हॉलीबॉल् स्पर्धा संपन्न

 

 कागल प्रतिनिधी सुभाष भोसले
 कागल येथे विभागीय शालेय शासकींय व्हॉलीबॉल स्पर्धा श्री शाहू हायस्कूल व ज्यूनि कॉलेज येथे उत्साहात पार पाडल्या .या स्पर्धेमध्ये सांगली सातारा रत्नागिरी सिधूदूर्ग कोल्हापूर या जिल्हयातील संघानी सहभाग घेतला या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य जे डी पाटील व जमीर अत्तार ,बी के मडिवाळ ,सौ सविता कुलकर्णी यांच्या हस्ते झाले .
या स्पर्धा चालू असताना कागलचे आमदार हसन मुश्रीफ नगरसेवक नितीन दिंडे ,अविनाश जाधव यांनी भेट दिली.या स्पर्थेमध्ये मुलांमध्ये कोल्हापूर ,मुलीमध्ये सातारा संघ पात्र ठरले या दोन संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली स्वागत क्रिडाशिक्षक महेश शेडबाळे यांनी केले व आभार प्रविण मोरबाळे यांनी मानले यावेळी सागर आवळे,अश्वीन नाईक,वैभव आडके,ईब्राहिम शेख,निखील खोत शहाजी गायकवाड  काकासो भोकरे,चंद्रकांत कासोटे , महादेव घोरपडे,कादर जमादार,बाबासो शिंदे,संजय पोतदार व इतर मान्यवर उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button