KagalKolhapur

राजे समरजितसिंह घाटगे यांचा भव्य शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल*

राजे समरजितसिंह घाटगे यांचा भव्य शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

राजे समरजितसिंह घाटगे यांचा भव्य शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल*

कागल प्रतिनिधी सुभाष भोसले
कागल,गडहिंग्लजसह उत्तूरच्या स्वाभिमानी जनतेने लाचारी फेकून पिवळे वादळ निर्माण केले आहे.आता क्रांती करून स्वराज्य उभा करूया.असे आवाहन समरजितसिंह घाटगे यांनी केले. कागल गडहिंग्लजसह उत्तूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काढलेल्या विराट पदयात्रेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून या पदयात्रेला प्रारंभ झाला.
गहिनीनाथ गैबीपीर, राममंदीर येथे दर्शनानंतर डाँ बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून पदयात्रेची सांगता झाली.
तत्पूर्वी शाहू कारखाना कार्यस्थळावर छत्रपती शाहू महाराज,स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास व कागलाधिपती जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेसही पुष्पाहार अर्पण केला.
यावेळी घाटगे पुढे म्हणाले, स्व.राजे विक्रमसिंह घाटगे व स्व. सदाशिवराव मंडलिकसाहेब यांनी स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा वारसा तमाम जनतेला दिला आहे. स्व.मंडलिकसाहेब यांनी २००९ च्या निवडणुकीत इतिहास घडवला होता. लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवून ते विजयी झाले होते. त्यावेळी सुद्धा त्यांची उमेदवारी डावलण्यात आली होती. याचा राग त्यांच्यापेक्षा जास्त स्वाभिमानी जनतेला आला आणि जनतेने त्यांची निवडणूक हातात घेऊन त्यांना विजयी करून इतिहास घडवला.नेमका तसाच घटनाक्रम कागल, गडहिंग्लजसह उत्तूर विधानसभा मतदारसंघात यावेळी माझ्या उमेदवारीच्या बाबतीत झाला आहे. त्यामुळे स्वाभिमानी जनता या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी पेटून उठली आहे.
ते पुढे म्हणाले, जनतेच्या आग्रहाखातर मी ही स्वाभिमानाची लढाई लढत आहे.आत्मकेंद्रित राजकारणाला फाटा देऊन आपण कागल गडहिंग्लजसह उत्तूर विधानसभा मतदारसंघात शाश्वत विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात करूया.असेही ते म्हणाले.
यावेळी मृगेंद्रसिंह घाटगे,अखिलेश घाटगे,प्रविणसिंह घाटगे,सुहासिनीदेवी घाटगे,सौ.नवोदिता घाटगे,वीरेंद्रसिंह घाटगे,
उदयबाबा घोरपडे,बाबासाहेब पाटील,बालाजी फराकटे,अमरसिंह घोरपडे,रवींद्र घोरपडे,उमेश देसाई,राजाभाऊ माळी,धनाजी पाटील आदीसह अलोट पिवळा जनसागर लोटला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button