Kagal

कागल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजे समरजितसिंह घाटगे यांना जाहीर पाठिंबा -अजित मोडेकर

कागल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजे समरजितसिंह घाटगे यांना जाहीर पाठिंबा -अजित मोडेकर

कोल्हापूर सुभाष भोसले
कागल विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राजे समरजित सिंह घाटगे यांना कागल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी तालुकाध्यक्ष अजित मोडेकर म्हणाले की,शाहू जनक घराण्याचे वारसदार राजे समरजितसिंह यांना कागलच्या राजकारणात एकटे पाडले.

समरजितराजे शाहूचां राजधर्म पाळत गेले 3 ते 4 वर्ष जनकल्याणासाठी झटत आहेत त्यांचे हे कार्य पाहून शाहू जनक घराणे आणि ठाकरे घराणे यांचा जिव्हाळ्याचा संबध आहे. त्यांना राजकारणात एकटे पाडल्यामुळ ते जनतेच्या ए .बी. फॉर्मवर अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवित आहेत.त्यामुळे जनतेच्या हितासाठी व कागलच्या शाश्वत विकासासाठी आम्ही राजेना पाठींबा देत आहोत.

यावेळी कागल शहराध्यक्ष दीपक घाटगे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कागल शाखाध्यक्ष शिवराज वाडकर, महिला तालुका अध्यक्षा आरती मगदूम, प्रदीप कोळी, अमर पाटील यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, संजय चौगुले, संजय पाटील, सुनील मगदूम , निवास पाटील तुकाराम पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button