Kagal

संताजी घोरपडे यांचा वारस या नात्याने मी समरजित़सिंह यांच्या पाठीशी : उदयबाबा घोरपडे

संताजी घोरपडे यांचा वारस या नात्याने मी समरजित़सिंह यांच्या पाठीशी : उदयबाबा घोरपडे

तुकाराम पाटील -कागल
शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे व नवोदिता घाटगे यांनी जलक्रांती घडवून आणली आहे. शाहू महाराजांचे हे वंशज व संपूर्ण कुटुंब कागल तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी झटत असताना संताजी घोरपडे यांचा वारस या नात्याने मीदेखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे असे प्रतिपादन उदयबाबा घोरपडे यांनी केले.

तमनाकवाडा येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले, भर पावसातही माता-भगिनी ठामपणे बसून आहेत.त्यांचे हे प्रेम पाहून मी भारावून गेलो.त्यांचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.माजी जलसंपदा मंत्री यांनी चिकोत्रा धरण भरण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? माद्याळ,बेलेवाडी मासा साठवण तलावासाठी का प्रयत्न केले नाहीत?.नागणवाडी प्रकल्प का रखडला?असे प्रश्नच आता स्वाभिमाना जनता त्यांना करत आहे त्यामुळे आमदाराच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यांना कागलच्या जनतेने योग्य जागा दाखवावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी भिकाजी तिप्पे,लांडगे-पाटील,दिलीप तिप्पे,सुनील मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उमेश देसाई,कर्नल शिवाजीराव बाबर,राजाभाऊ माळी,मधुकर साळवी,निवृत्ती तिप्पे,संदीप तिप्पे,जयदेव चौगले,साताप्पा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ,महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button