Jalana

शेकडो युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश

शेकडो युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश

संजय कोल्हे जालना

अंबड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचाराणे प्रेरित होऊन मुख्यमंत्री मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रभावित होऊन शिवसेना सहसंपर्कप्रमुख माजी आमदार शिवाजीराव चोथे साहेब व माजी आमदार संतोषजी सांबरे यांच्या नेतृत्वा खाली तालुका प्रमुख अशोक बर्डे , उपजिल्हाध्यक्ष हनुमानजी धांडे शहरप्रमुख कुमार रूपवते यांच्या मार्गदर्शनाने अंबड़ शहरातील अमोल ठाकुर , बाबू लांडे , दत्ता लोहकरे यांच्या सह 150 लोकांनी शुवसेना व युवसेनेत प्रवेश केला. तसेच यावेळी प्रहार संघटनेचे अब्बास हाश्मी, जगन ढेरे,अर्जुन भुकण, संजय शेवाळे, स्वामी भसंदे यांच्या सह ३० दिव्यांग बांधवांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार शिवजीराव चोथे यांनी भगवा ध्वज हातात देत पक्ष विस्तार करण्या संबंधी सूचना दिल्या उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले यावेळी श्री शिवाजीराव चोथे यांच्या वाढदिवस साजरा करत उपस्तित युवकांनी पुष्पहार देत शुभेच्छा दिल्या
तसेच नवीन प्रवेश केलेल्या युवकांचे श्री विनायक चोथे , दिनेश काकड़े,बाळासाहेब इंगले, रवी इंगळे, दत्ता शिराळे,राम लांडे , रमेश वराडे , दत्ता मुर्डताडकर, सुरेश राणा, संदिप सदावर्ते. राहुल साळूंके यांनी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button