Jalana

संध्याकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहनाच्या इशाऱ्याचा व्हिडिओ टाकून पोलीस हवालदार गायब जिल्हा पोलीस प्रशासनात एकच खळबळ

संध्याकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहनाच्या इशाऱ्याचा व्हिडिओ टाकून पोलीस हवालदार गायब जिल्हा पोलीस प्रशासनात एकच खळबळ

संजय कोल्हे जालना

जालना : जालना जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत,बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण आणि पक्षपात झाल्याचा आरोप अन्याय झालेल्या पोलिसांकडून करण्यात येत आहे.घनसावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन काही दिवसापूर्वी विनंती बदलीचा अर्ज केला होता.मात्र आत्तापर्यंत दोन ते तीन बदल्यांच्या याद्या निघूनही गोविंद कुलकर्णी यांची बदली झाली नसल्याने ते नाराज होते.त्यामुळे गोविंद कुलकर्णी यांनी आज एका व्हाट्सअप ग्रुपवर स्वतःचा व्हिडिओ बनवून बनवून त्यामध्ये माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन, असा इशारा दिला आहे या इशाऱ्यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून कुलकर्णी यांच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली होती.दरम्यान सायंकाळी त्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला यश आल्याचे समजते._

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button