Maharashtra

नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग माहिती

प्रतिनिधी पी व्ही आनंद

नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग माहिती आणि प्रसिद्धीवैद्यक आणि समाजकल्याण ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले.

धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले .

नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. ‘सत्यकथा’ हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे.

पुस्तके
आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर)
आयुष्य जगताना
एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन)
एक पूर्ण – अपूर्ण (आत्मचरित्रपर)
ओळखीची वाट (कवितासंग्रह)
जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव)
टाकीचे घाव
डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
तिढा (कादंबरी)
तुझ्याविना (कादंबरी)
पुनर्भेट (अनुभवकथन)
मी क्रांतिज्योती (अनुभवकथन)
मैत्र (ललित लेख)
रात्र वणव्याची (कादंबरी)
सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button