Jalana

मंठा पंचायत समितीच्या एमआरईजीएस विभागाला लागलेल्या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी भ्रष्टाचार लपविण्यासाठी आग लावल्याचा संशय…

मंठा पंचायत समितीच्या एमआरईजीएस विभागाला लागलेल्या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी भ्रष्टाचार लपविण्यासाठी आग लावल्याचा संशय…

संजय कोल्हे जालना

जालना : मंठा पंचायत समितीच्या एमआरईजीएस विभागाला मंगळवार ता. 10 रोजी पहाटे आग लागली या आगीत मनरेगा अंतर्गत घरकुल एमआरईजीएसचे मस्टर, विहिरीच्या फाईल, शोषखड्डे, गायगोठा व शौचालयाच्या फाईली जळून खाक झाल्या. ही आग शॉर्टसर्किटने न लागता पूर्वनियोजित प्लॅनिंगने आग लावल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. ही आग गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनीच भ्रष्टाचार लपविण्यासाठी लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंठा नगरपंचायतला आगीची माहिती सकाळी 9:35 वाजता मिळाल्यावरून अग्निशामक दलाचे कर्मचारी रामेश्वर बोराडे, राजेश जाधव, संतोष बोराडे अग्निशामक वाहनासह घटनास्थळी पोहोचून आग विझवली. या ठिकाणी पोलीस निरीक्षक यशवंत बागुल, बीट जमादार दीपक ढवळे, केशव चव्हाण, दीपक आढे, प्रशांत काळे, इंदलसिंग राठोड आणि विजय तांगडे यांनी भेट देऊन पाहणी केली असता घटनेच्या आदल्या दिवशीच सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नेल्याचे निदर्शनास आले. या आगीसाठी ज्वलनशील पदार्थ वापरल्याचा अंदाज आहे. शॉर्टसर्किटने आग लागली असती तर पंचायत समितीच्या इतर विभागाला सुद्धा त्याची झळ बसून प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले असते. सध्या मंठा तालुक्यात एमआरईजीएसची कामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत यात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत यापूर्वीच गेल्या आहेत. घटनास्थळाला पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे यांनी भेट दिली. या आगीमुळे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्या विषयी संशय व्यक्त केला जात आहे.================ ===चौकट ….. मंठा पंचायत समितीच्या महत्वाच्या असलेल्या एमआरईजीएस विभागाला लागलेल्या आगीची सीबीआय चौकशीची मागणी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब वांजोळकर, रोहयो समितीचे सदस्य सुरेश वाव्हळ यांनी केली आहे.======================

संबंधित लेख

Back to top button