Jalana

शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी चोथे यांची पत्रकार परिषद

शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी चोथे यांची पत्रकार परिषद

अंबड : नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री आपेक्षर्ह भाषा वापरली आहे. माझ्या आयुष्यात असा मुर्ख, नीच माणूस पाहिला नाही, नारायण राणे निषेध करतो असे आज संपर्क कार्यलयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला

यावेळी बोलताना चोथे म्हणाले कि स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणा-या भाजपातील काही नेते कधी शेतक-यांना साले म्हणतात,काँग्रेस नेत्याला वळू म्हणतात,तर प्रधानमंत्र्यांना बैल म्हणत आहेत. या अशा वक्तव्यांमुळे येणा-या निवडणूकीत भाजपाला त्याचे परीणाम भोगावे लागतील. आणि शिवसेना आणखी ताकतीने राज्यातील एक नंबरचा पक्ष बनेल.
माननीय पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी आम्हाला संयम ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र नारायण राणे हे नेहमीच शिवसेनेच्या विरोधात बोलतात म्हणूनच त्यांना केन्द्रात मंत्रीपद देण्यात आले असावे. नारायण राणेच्या या बेताल वक्तव्याने शिवसैनिक पेटून उठला आहे. संत महंतांच्या पावन भूमीत पक्षप्रमुख उध्दवसाहेबांचा अपमान सहन करणार नसल्याचे सुध्दा शिवाजी चोथे यांनी स्पष्ट केले आहे.यावेळी शिवसेना विनायक चोथे, शहरप्रमुख कुमार रुपवते, युवासेनातालुका प्रमुख रामशेठ लांडे, सतिश धुपे, यासह आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button