Yawal

हिंगोणा ते मारुळ फाटा न्हावी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे ;चौकशी ची मागणी सार्वजनिक विभागाने लक्ष दयावे

हिंगोणा ते मारुळ फाटा न्हावी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे ;चौकशी ची मागणी सार्वजनिक विभागाने लक्ष दयावे

यावल ( शब्बीर खान )

तालुक्यातील हिंगोणा ते न्हावी फाटा मारूळ येथुन . डांबरीकरण रस्त्याचे काम होत आहे ., सदरचे काम हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे होत . असुन रावेर / यावल .विधानसभा क्षेत्राचे आ. शिरीष चौधरी यांनी या कामाची चौकशी करून . सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या बाबत विचारणा करावी व होणार्‍या बोगस कामा विषयी ठेकेदाराला . चांगल्या प्रतीचे काम करण्याच्या सुचना द्यावे अशी मागणी होत आहे . सदर हिंगोणा ते मारुळ फाटा न्हावी रोड चे काम आता सुरु आहे ते रस्त्याचे काम प्रत्यक्षात संबंधीत ठेकेदारांने सुरूवात केली असुन ,सदरचे काम अत्यंत: निकृष्ठ प्रतिचे होत आहे तरी संबधीत विभागानेतात्काळ हे होत असलेले निकृष्ठ प्रति चे काम थांबवावे व सदर ठेकेदाराकडुन रस्त्याच्या कामाची रुंदी व लेअर कशा प्रमाणे असुन त्या नुसार काम करण्यात यावे अन्यथा ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येवु नये विशेष या कामाला १५ ते विस दिवस सुरु करायला झाले आहे पण आज पर्येंत या रस्त्यावर संबधीत ठेकेदार व सार्वजनिक बांधका विभागाचे इंजिनिअर किंवा अधिकारी विजेट दयायला आलेले नाही का ? असा प्रश्न निमार्ण झालेला दिसत आहे . सर्व काम राम भरोसे सुरु दिसत आहे ..रस्त्याचे डांबरी करण व खडी करण चे काम होत असुन त्या मध्ये डांबर व खडी ही फक्त ठेकदार याच्या मनमानी नुसार वापरली जात आहे . विशेष म्हणजे जुन्या रस्त्यावर . झाडू व साफ सफाई न करता त्याचा वर खडी आथरून . व डांबर चा फवारा मारून . लोलर फिरवुन देत आहे . हे काम अत्यंत बोगस रित्या होत आहे असे जर काम सुरु राहीले तर . येणाऱ्या पावसाळ्या पर्यंत या रस्त्याचे पूर्ण बारा वाजतील तसेच शासनाचा लाखो रुपयाचा निधी . पूर्ण वाया झाल्याशिवाय राहणार नाही यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्या वर लक्ष केंद्रीत करावे व ठेकेदाराला चांगल्या कामाच्या सुचना द्यावे व होणारे बोगस रित्या काम थांबवावे अशी मागणी वाहन धारकांनी केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button