AmalnerMaharashtra

?️ Big Breaking..अमळनेर शहराची कोरोना घाडदौड पुन्हा जोरात सुरू…

Big Breaking..अमळनेर शहराची कोरोना घाडदौड पुन्हा जोरात सुरू…

अमळनेर शहरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. आता पर्यंत सर्व सामान्य व्यक्तींपर्यंत मर्यादित असलेला कोरोना आता राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेत दाखल झाला आहे.
आज पुन्हा 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात धुळे रोड वरील 70 वर्षीय पुरुष मयत झाले आहेत. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेली ही व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे.

अमळनेर पुन्हा 5 पॉझिटिव्ह एकूण 137 मयत मयत 16

  • धुळे रोड 70 वर्षीय पुरुष मयत पॉझिटिव्ह नेता
  • गणेश कॉलनी तांबेपुरा 22 वर्षीय पुरुष
  • त्रिकोणी बगीचा 68 वर्षीय पुरुष
  • सराफ बाजार 70 वर्षीय पुरुष मयत व एक 55 वर्षीय महिला

असे पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत यात एका
मृत राजकीय नेत्याचाही संपर्क आल्याने खळबळ
उडाली आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील ८५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या तब्बल १३७ पर्यंत पोहचली असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ३० मे
रोजी १३ जण पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या
संपर्कातील ४५ जण व ३१ रोजी पॉझिटिव्ह आलेल्या ५ जणांच्या संपर्कातील ४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, मृत राजकीय नेत्यांच्या संपर्कातील
काही राजकीय नेते , कर्मचारी, यांना देखील होम
क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button