चंद्रपूर

अतीवृष्ठीग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. ब्रह्मपुरी तालुका काँग्रेसची मागणी.

अतीवृष्ठीग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा.
ब्रह्मपुरी तालुका काँग्रेसची मागणी.

ज्ञानेश्वर जुमनाके
ब्रम्हपुरी :– ३१ आक्टोंबर २०१९
नुकत्याच परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीमुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हलक्या व मध्यम धान इतर अनेक शेतपिकांना अतिवृष्टीचा जबर फटका बसला असून अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

तेव्हा शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. तहसीलदार, ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात येवुन करण्यात आली.
याप्रसंगी सर्वश्री तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे, पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर,शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरपरिषद गटनेते विलास विखार, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ मंगलाताई लोनबले, नगरसेविका सौ सुनिता तिडके, नगरसेवक महेश भर्रे, राजेश पारधी, जगदीश आमले, दिवाकर मंडपे, सुरेश वंजारी,अमोल सलामे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button