चंद्रपूर

मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन नागपूर येथे चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक संपन्न

मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन नागपूर येथे चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक संपन्न

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांनी विधानसभा क्षेत्रातील अनेक समस्यांविषयी प्रशासनाला केले अवगत

नागपूर विधानभवन येथे मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिह्याची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया हे उपस्थित असून त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील अनेक समस्यांबाबत प्रशासनाला अवगत केले सदर समस्यांनमध्ये विशेषतः महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरउद्घाण महाभियांन अंतर्गत टंचाई ग्रस्त क्षेत्रातील मंजूर तथा अत्यावश्यक चिमूर नगर परिषद पाणीपुरवठा योजना,नागभीड नगर परिषद पाणीपुरवठा योजना या प्रकल्पाची कामे त्वरीत पूर्ण होण्यासाठी विनंती केली आणी त्या विनंतीस मुख्यमंत्री मोहोदयासह इतर संबंधीतांनी मान्यता दिली.

नागभीड तालुक्याच्या नागभीड व तळोधी येथील पोलीस स्टेशन इमारत आणी आवश्यक वसाहत बांधकामास विषेश बाब मंजुरीसह निधी उपलब्द करण्याचा विषय आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी उपस्थित केला. या विषयाला सुद्धा आमदारांच्या मागणीला सभागृहाने मान्यता दिली.

नागभीड ग्रामीन रुग्णालयास १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय देर्जोनत्तींच्या प्रलंबीत प्रस्तवास जो प्रस्ताव शासनाकडे २० जानेवारी २०१६ रोजी पासून श्रेणीवर्धन प्रस्ताव प्रलंबीत आहे या प्रस्तावाला विशेषबाब मंजुरी देण्याचे बैठकीमध्ये मुख्यमंत्री मोहोय यांनी मान्य केले.

शिवनाला उपसा सिंचन योजना नागभीड तालुकाच्या लाभ क्षेत्रात वाढ होण्यास पी.डी. एन.पद्धती ऐवजी दाबयुक्त नलिका वितरण प्रणाली योजनेत अतिरिक्त वाढीव क्षेत्र व खर्चाचा अंतर्भाव निविदे अंतर्गत होणे यासह बांधकामास विशेष बाब मंजुरी मिळण्याच्या प्रस्तावावर मा.आमदारांनी लक्ष वेधले मुख्यमंत्री मोहोदयांनी विशेष निधि उपलब्ध करण्याचे मान्य केले.

गोसेखुर्द धरणाचे पानी उपसा सिंचनाद्वारे पाईप लाईनने घोडाझरी तलावात टाकणे व घोडाझरी तलावाची मुख्य वितरीका व उप वितरीकांची दुरुस्ति करून वाहन क्षमता वाढविण्याची वितरीका रुंद व उंच करण्याच्या प्रलंबित योजनेच्या प्रस्तावास निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सभागृहाचे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री मोहोदयानी व बैठकीचे अध्यक्ष यांनी सहमती दर्शविली आहे एकूण ९० कोटी रुपये रकमेचा हा प्रस्ताव आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button