चंद्रपूर

क्रीडा महोसत्वातून विद्यार्थी घडतात-भावना बावनकर

क्रीडा महोसत्वातून विद्यार्थी घडतात

भावना बावनकर

ज्ञानेश्वर जुमनाके

शंकरपूर….
विध्यार्थ्यांनच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी क्रीडामहोत्सव एक माध्यम आहे या माध्यमाचा उपयोग विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे अश्या क्रीडा महोत्सवातून विध्यार्थी घडत असतात त्यामुळे शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्यक विद्यार्थ्याला यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य भावना बावनकर यांनी केले आहे ..
हिरापूर येथे आयोजित बीट स्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा तथा सांस्कृतिक संमेलन मध्ये उदघाटन स्थानावरून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पंचायत समिती सदस्य रोशन ढोक प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आमोद गौरकर, उपसरपंच अस्मिता वाघमारे ,शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पिसे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास राणे, केंद्र प्रमुख रूपंचांद बनसोड ,भास्कर बावनकर, बंडू बावनकर, जोगेंद्र कडू, सरपंच दीपक येवले , सुनील मुंघाटे, बंडू पोहनकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थी नि पाहुण्याच्या समोर कवायत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पिसे, संचालन शिक्षक सुखराम खेडकर, आभार अशोक गायकवाड यांनी केले….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button