चंद्रपूर

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन चंद्रपुर जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग शुरू करा :-सैय्यद अनवर कामगार नेते

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन
चंद्रपुर जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग शुरू करा :-सैय्यद अनवर कामगार नेते

घुग्घूस :- चंद्रपुर जिल्हा हा प्रामुख्याने आद्योगिक जिल्हाबअसून आज जिल्ह्यातील प्रामुख्याने 50% उद्योग बंद झाले आहे किंवा शुरू असलेले उद्योग डबघाईस आलेले आहे.
जिल्ह्याभरात जवळपास एक लाखाच्यावर युवक हे बेरोजगार असून युवावर्ग हताशेतुन, निराशेतुन बेरोजगारीमुळे व्यसनाकडे वळत आहे.
हाताला रोजगार नसल्यामुळे व चंद्रपुर जिल्हा दारुबंदीचा जिल्हा असल्यामुळे युवावर्ग दारू 0विक्रीच्या धंद्यात रोजगारासाठी नाईलाजाने शामिल होवून आपले आयुष्य बर्बाद करीत आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे महसुल मंत्री ना. बाळा साहेब थोरात यांची हिवाळी अधिवेशना निमित्य नागपुर विधानसभा मध्ये दिनांक 17 डिसेंबर रोजी भेट घेवून जिल्ह्यातील बंद झालेले उद्योग शुरू करून स्थानिक युवकांना रोजगार द्यावे अश्या मागणीचे निवेदन कामगार नेते सैय्यद अनवर यांनी दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button