बॅन्ड वाजविण्याची परवानगी व आर्थिक सहाय्य मिळावे- संघटनेची मागणी
आमदार चंद्रकांत पाटिल , आमदार शिरीष चौधरी प्रयत्न करणार
प्रतिनिधी संदीप कोळी
निंभोरा बु।। ता रावेर(वार्ताहर)कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉक डाउन असल्याने गेल्या मार्च महिन्यापासून ऐन बॅन्ड कलावंताना रोजगार मिळेल या दरम्यानच हा व्यवसाय सर्वत्र बंद पडल्याने सर्व बॅन्ड कलावंताना उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसायसाठी बँक कडून व दूसरी कडून कर्ज बॅन्ड व्यवसायच्या आधारावर मोठ्या प्रमाणात घेतलेले आहे.परंतु बॅन्ड व्यवसाय बंद असल्याने सर्वांची उपासमारी होतच आहे त्याचबरोबर घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न उदभवला असून म्हणून महाराष्ट्र बॅन्ड कलाकार संघटने तर्फे रावेर ,यावल, मुक्ताईनगर या विभागा तर्फे मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटिल, रावेर यावल आमदार शिरीष चौधरी, फैजपुर प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याकडे रावेर यावल मुक्ताईनगर विभागीय अध्यक्ष बबन बडगे,विभागीय उपाध्यक्ष राजीव बोरसे, रावेर तालुकाध्यक्ष निरज सोनवणे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष सुरेश भालेराव तसेच विभागीय सरचिटणीस आतिष केदारे, सावदा शहरध्यक्ष किशोर लोखंडे , यासह पदधिकाऱ्यांनी संघटनेतर्फे निवेदन देऊन बॅन्ड वाजविण्याची परवानगी मिळावी व आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी निवेदन द्वारे केली आहे
*बॅन्ड कलावंताना सहकार्य करणार- आ.चंद्रकांत पाटिल*
लग्न समारंभासाठी ५०जणांची परवानगी आहे यात बॅन्ड पथकाला देखील परवानगी १०जणांना असून याबाबत आपण जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटिल व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून बॅन्ड कलावंताना निश्चित सहकार्य करू असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटिल यांनी सांगितले
—-/
*आ.शिरीष चौधरी यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र*
बॅन्ड वाजविन्यास परवानगी मिळण्या बाबत आमदार चौधरी कडे बॅन्ड संघटनेने निवेदन देऊन मागणी केली असता त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कडे पत्र दिले असून आपण बॅन्ड कलावंताच्या मागणी संदर्भात पाठपुरावा करू असे सांगितले
तसेच प्रांतधिकारी यांनी ही निवेदन स्विकारून वरिष्ठांकडे पाठवू असे सांगितले






