Nanded

मणिपुर घटनेच्या आरोपींना फाशी द्या; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदची मागणी..

मणिपुर घटनेच्या आरोपींना फाशी द्या; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदची मागणी..

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

बिलोली मणिपूर येथील त्या घटनेच्या दोषीना फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.दि 4 में 2023 रोजी मणिपुर मधील भांगपोकर्णा जिल्ह्यात बी फिनोम गावात जमावाने तोडफोड करून लूटमार करत कुकी समुदायाची घरे जाळण्यात आली. लोकांची हत्या केली. दोन महिलांची निर्वस्त्र करून धीड काढण्यात आली. दिनांक 21 जून 2023 रोजी पोलिसात तकार नोंद करण्यात आली..या घटनेच्या व्हीडीओ सोशल मिडियावर पाहण्यात आला. या राष्ट्रीय मानहानीकारक घटनेवर देशभरातून संताप व्यक्तीस आहे. या घटनेच्या सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी दखल घेत संबंधीत घटना म्हणजे घटनात्मक व मानव अधिकाराचे लोकशाही मध्ये अशा गोष्टीचे थारा नसल्याचे नमूद करीत मनिपूर सरकारने तातडीने कारवाई करावी. अन्यथा आम्ही कार्यवाही करू म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेतील आरोपीना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, मृत्यू पावलेल्यांना 50 लाख रुपये व जखमींना 10 लाख रुपये आर्थीक मदत करण्यात यावी, अशी बिलोली तालुका राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने तहसीलदार मार्फत राष्ट्रपती दिल्ली यांच्या कडे मागणी करीत आली.निवेदनावर राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष ए.जी कुरेशी, सय्यद रियाज , कार्याध्यक्ष संजयकुमार पोवाडे, सचिव शेख वाजीद अब्दुल्ला,मोईन सेठ,अ. रशीद खयुम सेठ,शेख युनुस कासरालीकर,शेख फारुक अहेमद, प्रा. मोहसीन खान, रफीयोदिन ईनामदार , ईरशाद मौलाना,शेख मसुद , मारोती खतगावकर सह अनेक जन उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button