Pune

? निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करा; खंडाळ्यात बावडा ग्रामस्थांचे उपोषण

निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करा; खंडाळ्यात बावडा ग्रामस्थांचे उपोषण

खंडाळा (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुकीच्या मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा आरोप करत निवडणूक कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बावडातील (ता. खंडाळा) ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

बावडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाने दिलेल्या कालावधीत तहसीलदार कार्यालयाकडे हरकती दाखल करण्यात आल्या. त्यामध्ये जो मतदार ज्या प्रभागात राहायला आहे त्याच ठिकाणी त्याची मतदार नोंदणी व्हावी, असा नियम असताना त्याची पायमल्ली करून यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यासंदर्भात हरकती दाखल करण्यात आल्या, तरीही बहुतांश हरकती डावलण्यात आल्याचे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्या वेळी अतुल पवार, नारायण पवार, श्रीकांत घाटे, राहुल पवार, ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र पवार, अभिजित पवार यांच्यासह ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button