Parola

माणुसकीचे नाते जपत राष्ट्रीय पक्षी ला जीवनदान

माणुसकीचे नाते जपत राष्ट्रीय पक्षी ला जीवनदान

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

पारोळा – तालुक्यातील सोके येथील रहिवासी चेतन संजय देवरे हा तरुण शेतात बैलांना चारापाणी करण्यासाठी सकाळी नित्यनेमाने जात असताना त्यास शेताच्या वाटेवर सकाळी ८ ते ९ च्या सुमारास जोरात पंख फडफडण्याचा आवाज आला असता त्याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली.
सादर ठिकाणी जखमी अवस्थेत मोर होता हे दृश्य पाहताच त्याने माणुसकीचे नाते जपत मित्राच्या सहाय्याने पारोळा येथील वनविभागाशी फोन वर संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली.
तद्नंतर वन विभागाने तात्काळ त्या स्थळावर येऊन जखमी अवस्थेतील मोराला प्रथमोपचार देत त्या मोराला पुढील उपचारासाठी नेले. सदर युवकाला वन विभागाने शाबासकी ही दिली. आता मोराची प्रकृती बरी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button