Kolhapur

शिक्षक भारती सांगली यांचे लेखाधिकारी श्री पोटे यांना शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी निवेदन.

शिक्षक भारती सांगली यांचे लेखाधिकारी श्री पोटे यांना शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी निवेदन.

सुभाष भोसले-कोल्हापूर
सांगली जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या ७व्या वेतन आयोगा नुसार सेवा पुस्तक साक्षांकित अजून झाले नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी निदर्शनास आणून दिले. तसेच पूर्वी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या कॅम्प नुसार जिल्ह्यातील शिक्षकांचे सेवा पुस्तक साक्षांकित झालीे नाहीत नोव्हेंबर अखेर जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक साक्षांकित करून देण्यात यावे अन्यथा १ डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारतीने दिला. तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी चे फाईली प्रलबिंत आहेत त्या मार्गी लावण्यास सांगितले.
यावर लेखाधिकरी श्री पोटे यांनी १ डिसेंबर पूर्वी जिल्ह्यातील ९५% काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

तसेच वेतन अधीक्षक श्री ढेपे यांची भेट घेण्यास गेले असता त्यांची भेट झाली नाही. कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सौ. उघडे यांना निवेदन दिले. सदर निवेदनामध्ये शिक्षकांचे माहे ऑक्टोंबर चे वेतन व DCPS चा ७ वा वेतनाचा फरक १९ ऑक्टोंबर प्रयत्न जमा करण्याचे विंनती केली. तसेच DCPS धारकांच्या पावत्या त्वरित देण्याची मागणी करण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

सदर बैठकीस शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर माने, महानगर अध्यक्ष आरीफ गोलंदाज, जिल्हा संघटक फैजल पटेल, सचिव आशिष यमगर, मनपा सचिव सुरेश संकपाळ, उपाध्यक्ष अनंत पाटील, कार्याध्यक्ष संजय पवार, अनिल पाटील, कोषाध्यक्ष रतन कुंभार, मनपा संघटक बिपिन पाटील, सचिन रुईकर,कार्यवाह नामदेव पाटील, नचिकेत भुई, शिराळा तालुकाध्यक्ष बाजीराव जाधव,साजिद सुतार, वाळवा तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, दीपक पाटील, दीपक संकपाळ, प्रवीण चव्हाण, उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button