यवतमाळ

गुरुदेव युवा संघटनेच्या वतीने गोरगरिबांना वस्त्रदान

गुरुदेव युवा संघटनेच्या वतीने गोरगरिबांना वस्त्रदान
तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात राबविला स्तुत्य उपक्रम

रुस्तम शेख

यवतमाळ :-यवतमाळ तालुक्यातील कारेगाव यावली येथे सर्व संत समृद्धी दिन व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे दि. ५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत भव्य आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात प्रमुख उपस्थिती म्हणुन गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी गोरगरिबांसह गरजूंना वस्त्रदान करुन स्तुत्य व सामाजिक उपक्रम राबविला.

कारेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी सर्व संत समृद्धी दिन व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येते.

महोत्सवाचे आकर्षण म्हणजे प्रसिद्ध प्रबोधनकार राजु विरदंडे महाराज यांचा जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले
महोत्सवाच्या सुरवातीला मनोज गेडाम यांनी दिप प्रज्वलन करुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. त्यानंतर गोरगरिबांना वस्त्रदान करण्यात आले.
यावेळी मनोज गेडाम यांच्या कार्याची दखल घेवून राजु विरदंडे महाराज यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

गोरगरिबांच्या हितासाठी व न्यायासाठी झटणारे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांचे कार्य हे निश्चितच गौरवास्पद असून ते करित असलेल्या कार्यांना भरघोस यश लाभो, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रबोधनकार विरदंडे महाराज यांनी केले .
तसेच यावेळी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे राजु विरदंडे महाराज यांचाही गुरुदेव युवा संघाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यामुळे आपण प्रेरित होवून जनसामान्यांच्या प्रश्नासाठी व न्यायासाठी झटत असल्याचे सांगीतले. तसेच राष्ट्रसंतांच्याच पाऊलावर पाऊल ठेवूनच सामाजिक कार्याचा वसा घेतल्याचे त्यांनी सांगीतले. आपण नेहमी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहू, असे आश्वासन उपस्थितांना दिले.

यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांसह गावकरी मंडळी व महोत्सव समितीचे गणेश चांदेकर, रमेश चांदेकर, नरेश चांदेकर, अमीत कांबळे, सुनील पंधरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button