Amalner

Amalner: यहाँ पर सब शांती शांती हैं…

Amalner: यहाँ पर सब शांती शांती हैं…

जाहीर आवाहन..

अमळनेर शहरात कोणताही अनुचित प्रकार आज दिनांक १४-०६-२०२३ रोजी घडलेला नसून अमळनेर शहरात शांतता आहे.

केवळ अफवांमुळे गावात पळापळ झाली आहे. तरी कुणीही घाबरून जाऊ नये. शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी (जागो-जागी) चौकात सीसीटीसी (CCTV) कॅमेरे बसविण्यात आले असल्याने जो कोणी गैरकृत्य करेल अथवा शहराची शांतता भंग करेल अशांचे सीसीटीव्ही फुटेज काढून कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कोणीही सोशल मीडियावर अफवांचे मेसेज अथवा अफवा पसरवणार नाहीत आपल्या सुरक्षिततेसाठी अमळनेर पोलीस (जळगाव पोलीस) प्रशासन सज्ज आहे.

दरम्यान अमळनेर शहरात चार दिवसांपूर्वी झालेल्या दंगली प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी १४ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली असून घटनेची माहिती घेत आहेत.

संशयित आरोपी अश्फाक शेख याच्या मृत्युची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी रुग्णालयात येऊन माहिती जाणून घेतली.
माजी नगरसेवक करीम सालार यांनी कार्यकर्त्यांसह येऊन घटनेची माहिती घेत इन कॅमेरा शवविच्छेदनची मागणी केली. घटनेची अधिक माहिती पोलीस घेत असून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

याच घटने संदर्भात विविध अफवा पसरवल्या जात आहेत. तरी त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button