यवतमाळ

डोंगरखर्डा येथे लोकसहभागातुन वनराई बंधारे

डोंगरखर्डा येथे लोकसहभागातुन वनराई बंधारे

रुस्तम शेख

कळंब तालुका जि यवतमाळ :- जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सध्याच्या परीस्तितीत शेतशिवारातील ओढे,
गावालगतचे नाले यामधील वाहत जाणारे पाणि अडविण्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात रेती , माती भरून प्रत्येक गावागावात वनराई बंधारे टाकण्यात येत आहे.सदर वनराई बंधार्याची कामे ही लोकसहभागातुन व स्थानीक ग्रामस्तरीय प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. या अनुषंगाने यवतमाळ जिल्हयात कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे वनराई बंधारे टाकण्यात आले. या बंधार्याने पाणि अडवा पाणि जिरवा ही संकल्पना पुर्णत्वास जाईल. व सध्याच्या परीस्थितित गुरा ढोरांच्या पिण्याच्या प्रश्नही मार्गी लागेल .असे कृषि सहाय्यक डोंगरखर्डा महेंद्र ओंकार यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच निश्चल ठाकरे, मंडल अधिकारी नितीन खरोडे, तलाठी धकाते, ग्राम विकास अधिकारी दिलीप लांजेकर, कृषि सहाय्यक महेंद्र ओंकार, चिंतामण पंचबुध्दे, सुभाष काकडे, रमेश काचोरे, सतिष वानखेडे, दयाकर बोरपे,पवन नानवटकर, संजय काचोरे,प्रफुल्ल नागपुरे, शेख फैजान , नितेश चावरे, रमेश खेकारे, दयानंद उईके आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button