यवतमाळ

मोझर येथील ट्रान्स्फार्मर तात्काळ बसवावे :-गुरुदेव युवा संघाची मागणी

मोझर येथील ट्रान्स्फार्मर तात्काळ बसवावे :-गुरुदेव युवा संघाची मागणी

रुस्तम शेख

दारव्हा तालुका :- यवतमाळ जिल्हयात दारव्हा तालुक्यातील मोझर (इजारा) येथील ट्रान्स्फार्मर मागील दहा वर्षांपासून चोरीला गेला असल्याने येथील शेतकरी बांधवाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ह्याबाबत महावितरणला सांगितल्यावर अद्याप पावेतो ट्रान्स्फार्मर बसविण्यात आले नाही.
वीज पुरवठा नसल्याने शेतकऱ्यांना अंधारात शेतात जगावे लागत आहे. त्यासोबतच वन्यप्राणी शेतमालाचे नुकसान करीत आहे. त्यामुळे मोझर येथील शेतकरी मोठे नुकसान सहन करीत आहे. सिंचनाची सुविधा असताना विजेअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

या गंभीर बाबीकडे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी लक्ष्य देत शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकावला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसानीबाबत माहीती दिली.

लाडखेड वीज वितरण कंपनीचे अधिकारी आधी एफआई आर आना असे सांगत आहे. तर दुसरीकडे लाडखेड पोलीस एफआयआर द्यायला तयार नाही.
ट्रान्स्फार्मर नसल्याने ओलीत कसे करावे असा प्रश्न येथील शेतकरयांना पडला आहे.
सदरहू ट्रान्स्फार्मर तातडीने बसवावे व शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा करण्या साठी वीज पुरवठा तातडीने गरजेचे असल्याचे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकारी याना निवेदनातून म्हटले आहे. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वीज वितरणाच्या अधीक्षक अभियंता सुरेश मडावी याना शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवायला सांगतो असे आश्वासन दिले
सदरहू कार्यवाही १० दिवसाचे आत करावी अन्यथा शेतकरयांच्या मुलाबाळा संह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी मोझर येथील किसान पुंजाराम बनसोड , श्रीकृष्ण राठोड, युवराज भीमसिंग राठोड, अमृत रामराव गड्माडे लक्समन गड्माडे विश्वनाथ निमसरकार, पांडुरंग बनसोड, देविदास मनावर, सुखदेव मुरडे , नामदेव पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button