शिरूड येथे बचत गटातर्फ मोफत मास्क वाटप
रजनीकांत पाटील
अमळनेर: कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सध्या प्रत्येक स्तरावर व्यक्ती पुढे येत आहे. खबरदारी चा उपाय म्हणून सरकार ने अत्यावश्यक सेवा वगळताअन्य सर्व सेवा बंद केल्या आहेत खडतर प्रसंगात डॉक्टर,वैद्यकीय अधिकारी,पत्रकार, पोलीस हे दक्ष राहत आपले कर्तव्य बजावत आहे. या अशा कठीण प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अमळनेर तालुक्यातील जानवे येथील महिला विकास महामंडळाच्या माध्यमातून समन्वयक रत्ना पाटील व इतर महिला बचत गटाने तयार केलेल्या मास्कचे शिरूड गावात ग्रामपंचायत जवळ मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील सरपंच सुवडू पाटील,पो.पा विश्वास महाजन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशीकांत पाटील, विरभान पाटील,विजय पाटील आनंद पाटील भावडू महाजन आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.