Maharashtra

फैजपुर सह परिसरात अवैध धंद्यांवर फैजपूर पोलिसांची कारवाई…

फैजपुर सह परिसरात अवैध धंद्यांवर फैजपूर पोलिसांची कारवाई…

फैजपुर सह परिसरात अवैध धंद्यांवर फैजपूर पोलिसांची कारवाई...

फैजपूर  प्रतिनिधी सलीम पिंजारी  – फैजपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणारे हातभट्टी दारू,देशी दारू,सट्टा बेटिंग वर ए.पी.आय. प्रकाश वानखडे हे फैजपुर पोलीस स्टेशनला रूजू होताच त्यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या ८ दिवसांत पोलिस स्टॉप सह बामणोद, पाडळसे, चिखली, विरोदा, फैजपूर, न्हावी, कासवा येथे धाढी टाकून चोरटीविक्री करणारे व त्यांच्या कज्बेतून देशी दारूबाटल्या, हातभट्टीची दारू, रसायन जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यात आरोपी म्हणून दारू विक्री करणारे पंकज दिलीप जावळे बामणोद याच्या कब्जेतून देशी दारू बाटल्या, संजय मोहन कोळी कासवा पाच हजार रुपये किमतीची रसायन हातभट्टी दारू , सय्यद युसूफ सय्यद बाबू पाडळसे याच्या कब्जेतून १० हजार ४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या, पांडुरंग शामराव कोळी पाडळसे याच्या कब्जेतून १००० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या, संतोष अमृत सोनवणे चिखली याच्या कब्जेतून ५० रुपयांची गावठी दारू, विनोद रंगनाथ कोळी न्हावी याच्या कब्जेतून ५२० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, भगवान उखर्डू कोळी विरोदा याच्या कब्जेतून १ हजार ४० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, पंकज पांडुरंग नेमाडे विरोदा याच्या कब्जेतून ४८० रुपयांची हातभट्टीची दारू, रमेश सेनफडू पाटील चिखली याच्या कब्जेतून १००० किंमतीची हातभट्टीची दारू यासह सट्टा बेटिंग घेणारे फैजपूर, बामणोद अशा ३ जणांवर कारवाई करून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोटरवाहन कायद्याप्रमाणे ३८ जणांवर केसेस करण्यात आले आहे. सदरच्या केसेस करून सुमारे दहा हजाराच्या वर दंडवसूल करून कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई हेड कॉन्स्टेबल विनोद बाउस्कर, पो.कॉ बाळू भोई यांनी केली आहे.
     हातभट्टी दारू, देशी दारू विकणार्‍यांवर येत्या ८ दिवसात ए.पी.आय. प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय जिजाबराव पाटील सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पो.कॉ .महेश वंजारी, उमेश सानप, उमेश चौधरी, किरण चाटे, महेंद्र महाजन यांनी सदरच्या आरोपी विरोधात कारवाई केली आहे. यामुळे देशी दारूविक्रेते, हातभट्टी दारूविक्रेते, सट्टा बॅटिंग यांच्यावर दहशत निर्माण झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button