Chalisgaon

चाळीसगावची श्वेता देव गायन स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल

चाळीसगावची श्वेता देव गायन स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल

चाळीसगाव – मनोज भोसले

येथील आनंदीबाई बंकट हायस्कूलची माजी विद्यार्थीनी श्वेता सतिश देव हिने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळा (मुंबई) यांच्यातर्फे नुकत्याच झालेल्या संगीत विशारद पदवी परीक्षेतील गायन प्रकारात जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या प्रारंभिक ते विशारद पुर्ब परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात जळगांव येथील विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयाच्या केंद्रातून चाळीसगावच्या श्वेता देव हीने ५६३ गुणांसह प्रथम येण्याचा मान पटकावला.

लहानपणापासूनच श्वेता हिस संगीताची आवड असल्याने संगीत ज्ञानपीठाच्या तीन परीक्षेत ग्रेड ‘ए प्लस’ मिळविला आहे. हॉर्मोनियमच्या तीनही परीक्षेत श्वेताने विशेष प्राविण्य संपादन केले आहे.

श्वेता हीस संगीत शिक्षीका पद्मजा खराडे यांचे मार्गदर्शन लाभले. शहरातील मॉर्निसा बायोऑर्गॅनिकचे संचालक सतीश देव व आनंदीबाई बंकट हायस्कूलमधील शिक्षीका वंदना मोराणकर यांची कन्या असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button