Amalner

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग काही स्वार्थी गल्ला भरू किराणा दुकाने शासकीय आदेशांची पायमल्ली आहेत सुरू…शासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग काही स्वार्थी गल्ला भरू किराणा दुकाने शासकीय आदेशांची पायमल्ली करत ठेवली आहेत सुरु

अमळनेर

येथे कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून लॉक डाऊन शहरात सुरू आहे. वेगवेगळ्या उपाय योजना राबविल्या जात आहेत. यात संचरबंदी सुरू असून कोरोना रुग्ण आणि मयत यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने संचारबंदी त वाढ करण्यात आली आहे.याशिवाय किराणा दुकानदार,भाजी,फळ विक्रेते,औषध विक्रेते यांच्या वारंवार बैठका घेऊन नियम समजावून सांगण्यात आले आहेत. यात शाररीक अंतर ठेवणे,मास्क वापरणे,दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घेणे, ग्राहकांसाठी सॅनिटायझर ची व्यवस्था करणे इ नियमांचा समावेश आहे.तसेच गंगाघाट येथील किराणा दुकानादार आणि त्यांची पत्नी कोरोना बाधित सकारात्मक आढळून आल्याने शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. तर रुग्ण संख्या वाढल्या नंतर काही भाग बंद करण्यात आले असून फक्त होलसेल किराणा विक्रेते दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच भाजी आणि फळ व्यापारी गल्ली बोळात रस्त्यांवर फिरून विक्री करत आहेत. ज्या किराणा दुकानांनी घर पोच सेवा देण्याचे मान्य केले आहे तीच दुकाने सुरू असणे आवश्यक आहे.

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग काही स्वार्थी गल्ला भरू किराणा दुकाने शासकीय आदेशांची पायमल्ली आहेत सुरू...शासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज

परंतु काही ठराविक दुकानदार नियमित पणे नियमांचे उल्लंघन करतांना दिसून येत आहेत.यात कैलास ट्रेडर्स गूळ मार्केट ह्या दुकानात कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर चेतन प्रोव्हिजन, कमल ट्रेडर्स,सेवामल बिनिया मल किराणा कुंटे रोड,अमळनेर ही दुकाने आज सुरू असलेली तर आढळून आलीच शिवाय दुकानांमध्ये गर्दी असून सोशल डिस्टन्गसिंग चा तर पहिल्या दिवसापासून ह्या दुकानदारांनी पार फज्जा उडविला आहे.नगरपरीषद कर्मचाऱ्यांनी ह्या दुकानांवर कार्यवाही देखील एकदा केली आहे पण काही शासकीय अधिकारी अश्या दुकानदारांना पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आले आहे.

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग काही स्वार्थी गल्ला भरू किराणा दुकाने शासकीय आदेशांची पायमल्ली आहेत सुरू...शासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज

लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि फक्त पैसा डोळ्यासमोर ठेवून स्वार्थासाठी गल्ला भरू काम करणाऱ्या ह्या दुकांदारांवर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि लोकांच्या आरोग्याशी खेळू नये हीच विनंती आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button