Pune

Exam Update: 10 वी 12 वी च्या निकालाच्या तारखा जाहीर..!

Exam Update: 10 वी 12 वी च्या निकालाच्या तारखा जाहीर..!

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परिक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या. मात्र निकाल लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती. यंदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यामुळे दहावी आणि बारीवी परीक्षांचा निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती.

दरम्यान विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता. तर दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता.

राज्य मंडळाकडून सुरुवातीला बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, तर दहावीचा निकाल पुढील ८ ते १० दिवसांत जाहीर होऊ शकतो, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
बारावी आणि दहावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल वेळेवरच लागणार आहेत. दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका जलद गतीने तपासणी होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. १४ लाख ५७ हजार २९४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली तर १५ लाख, ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button