आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन कडून पंढरपूर मध्ये अडकलेल्या बेघर व्यक्तींना टी शर्ट वाटप÷सागर कदम
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर.भारतासह जगभरात कोरोना ह्या विशानुने जे थैमान घातलेले आहे.त्या मुळे महाराष्ट्रा सह पंढरपुर मधेही गेली दोन महीने झाले बंद पाळण्यात आलेला आहे. त्या मुळे पंढरपूर काही हॉटेल कामगार तसेच वारकरी व काही व्यक्ती हे मठात,पंढरपूर बस स्टँड,प्रदक्षणा रोड येथे अडकलेले आहेत तरी जेव्हा बंदची हाक दिली तेव्हापासून आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन यांच्याकडून अन्न वाटप करण्यात येत आहेच, तसेच त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात आलेली आहे.पण माणसाला जगण्यासाठी अन्न,वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टींच्या आवश्यक्ता असते.
लाॅकडाऊन चालू झाल्यापासुन आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनकडून आज पर्यंत अन्न व निवारा यांची सोय करण्यात आलेली आहे.आज रोजी त्यांनी गंगागिरी महाराज मठ येथे अडकलेल्या कामगारांना टी-शर्ट देऊन त्यांची वस्त्रचीही सोय करुन देण्यात आलेली आहे.या वेळेस आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम,संस्थेचे उपाध्यक्ष सतीश आप्पा माने,संस्थेचे सचिव ओंकार चव्हाण,बाळासाहेब गोडबोले. गणेश थिटे,शेखर भोसले,निलेश गंगथडे,सोपान काका देशमुख,गणेश निंबाळकर,आनंद कथले सर तसेच इतर कार्यकर्ते ही उपस्थित होते.






