Jalana

मुख्याधिकारी निवास स्थानाशेजारचे अतिक्रमण जमिनदोस्त तहसीलदार तथा मुख्याधिकारी विद्याचरण कडवकर यांची कारवाई

मुख्याधिकारी निवास स्थानाशेजारचे अतिक्रमण जमिनदोस्त तहसीलदार तथा मुख्याधिकारी विद्याचरण कडवकर यांची कारवाई

संजय कोल्हे जालना

अंबड : शहरातील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांचेसाठी कोर्ट रोडवर शासकीय निवासस्थान असुन या निवासस्थाना शेजारी काही लोकांनी मिळुन अतिक्रमण करीत लोखंडी पत्राच्या दुकाना तयार केल्या होत्या संबंधित लोकांना जागेच्या मालकी हक्काबाबत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता ते शासकीय जमीनीवर अतिक्रमण असल्याचे आढळुन आल्याने तहसीलदार तथा नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी विद्याचरण कडवकर यांनी सदरील अतिक्रमण दि.30 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा जमिनदोस्त करीत अतिक्रमण धारकास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सकाळीच यंत्रणा उभी करून अतिक्रमण काढण्यास सुरवात केली दुपारपर्यंत सर्व अतिक्रमण काढण्यात आले असुन याच अतिक्रमण शेजारी एक बांधकाम सुरू असल्याने त्या बांधकाम धारकास पालिकेत कागदपत्रे सादर करण्याची सुचना देण्यात आल्याची माहिती सुत्राकडुन कळते.अतिक्रमण हटाव पथकात तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली
गोपाल चौधरी स्वच्छता निरिक्षक,
ऋषीकेश जोशी नगर अभियंता,
प्रवीण शिंदे विद्युत अभियंता,
शफीयोद्दीन हसन्नोद्दीन,प्रदिपसिंग ठाकुर, दासवाड,भारत जाधव ,पांडु देशपांडे,संतोष खरात, रहिमतुल्ला सह इतर कर्मचा-यांचा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button